ऊस गाळप हंगामाच्या ऐन तोंडावर प्रमुख 5 ऊसतोड मजूर संघटनांनी नवीन करारासाठी संप पुकारला आहे. नवा करार होत नाही तोपर्यंत ऊसतोड टोळ्या बेलापूरला म्हणजेच कारखान्यांवर निघू देणार नाही, असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे.