गणेशोत्सवाची तयारी सध्या वेगानं सुरू आहे. गणेशोत्सवाच्या आरास साहित्यानं फुललीय. वेगवेगळ्या रंगाच्या माळा, नव्या पद्धतीचे झिरमाळ्या असलेले पडदे यांनी पुण्यातल्या बाजारपेठा फुलल्या आहेत. घरातल्या बाप्पाच्या मुर्तीला अनुसरुन या बाजारातून आरास साहित्य घेतले जात आहे.