विदर्भाची प्रति पंढरी अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातील घोराड येथे मोठ्या उत्साहात धार्मिक परंपरेने बैलपोळा साजरा होतो. एक गाव एक पोळा अशी या गावची विशेष ओळख आहे. येथे बैलांचा व नंदीपोळा एकच भरत असतो. बैलांचा पोळा संत नामदेव महाराज समाधी मैदानावर तर नंदी पोळा हा विठ्ठल रुक्माई मंदिरासमोर भरतो. अंदा...