World Cup 2023 : आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात रविवारी सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजांनी साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत त्यांना 83 धावांवर ऑल आउट केले आहे. यासह टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मधील सलग आठवा सामना जिंकला आहे.