गुरुवारी भारत आणि बांगलादेश संघातला वर्ल्ड कप साखळी सामना पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यादरम्यान पुण्यातल्या अमित भाई नावाच्या एका चाहत्यानं हनुमानाच्या वेशात येऊन सर्वांचं लक्ष वेधलं.