सलग सुट्ट्यांमुळे कोकणात जाण्यासाठी पर्यटकांची पावलं वळली खरी, पण मुसळधार पावसामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला. अनेकांनी तर बुकिंग रद्द केलं. पण रत्नागिरीच्या दापोलीत काही पर्यटकांनी पावसाळी वातावरणातही समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटला.