मनात जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर खडतर परिस्थितीवर मात करत मोठ्या यशाला गवसणी घालता येते. जालना येथील मेंढपाळाच्या मुलीनं आपल्या कर्तृत्वानं हेच सिद्ध केलंय. अर्चना डोळझाके ही भारतीय नौदलात दाखल झाली आहे. आईनं दागिने गहाण टाकून मुलीला पैसे पाठवले अन् अर्चनानं आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलंय...