सध्याच्या काळात शेतकऱ्यांची मुलेही विविध क्षेत्रं गाजवत आहेत. यात मुलीही मागे नाहीत. छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी कन्येनं मोठं यश मिळवलंय. फुलंब्री तालुक्यातील कान्होरीच्या गीता म्हस्के हिनं महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद नेमबाज स्पर्धेत सुवर्णवेध घेतलाय. या कामगिरीमुळे ती सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनलीय....