दर चार वर्षांनी होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन सुरू झालंय. सर्व क्रिकेट फॅन्सचं लक्ष आता वर्ल्ड कपकडं लागलंय. टीम इंडियानं 1983 साली पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. 83 च्या वर्ल्ड कपमधील सेमी फायनल आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच, पटकावून इतिहास घडवणारा महान क्रिकेटपटू म्हणजे मोहिंदर अमरनाथ.