आपल्या आजूबाजूला चहाचे अनेक शौकीन आपण पाहतो. त्यांना चहा शिवाय जमत नाही. पुणेकर तर चहाचे शौकीन आहेत. पुण्यात खाण्याच्या प्रकारइतकेच चहाचे प्रकार मिळतात. अमृततुल्य चहा, बासुंदी चहा, मसाला चहा तुम्ही नक्कीच पिला असेल. पण कधी शेतकरी स्पेशल तंदूर चहा घेतलाय का? नाही ना… पुण्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं य...