26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेनं पाकव्याप्त भागात जोरदार हल्लाबोल केला. पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय वायूदलाच्या मिराज-2००० या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्ब वर्षाव केला. अवघ्या 21 मिनिटात Air Strike करून 12 ही लढाऊ विमानं सुरक्षित परतली. याबद्दल संरक्षण तज्ञ पी. के. सेहगल आणि निवृत्त लष्कर अधिकारी ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी मुद्देसूद विश्लेषण केलं.