मुंबई, 08 जून : यंदा दहावीची निकालाची टक्केवारी ७७.१० टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीचा निकाल ८९.४१ टक्के लागला होता. त्या निकालाच्या तुलनेत १२.३१ टक्के निकाल कमी लागला. घटलेला निकाल म्हणजे सूज कमी झाल्याचा दावा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केला आहे.