शिर्डी, 09 मे : स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांची 87वी जयंती लोणी गावात साजरी करण्यात आली. यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि राम शिंदे उपस्थित होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा लक्षात घेता चंद्रकांत पाटलांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरला.