मुंबई, 08 ऑक्टोबर : मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात अजगर दिसला. तब्बल 13 फूट लांबीचा हा अजगर मैदानात सरपटत होता. त्याला बघायला अनेकांनी गर्दी केली. त्यातल्याच काही सजग नागरिकांनी सर्पमित्रांना बोलावलं. मात्र बघ्यांच्या गर्दीमुळे हा अजगर घाबरून पुन्हा मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी गेला. सर्पमित्रांनी त्याला शोधून जाळीत पकडलं. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे ठाण्याच्या जंगलात सोडून देण्यात आलं.