15 एप्रिल : पुणे - नगर महामार्गावर रांजणगाव इथं शिवशाही बसला भीषण अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. पुण्याहून औरंगाबादच्या दिशेनं ही बस जात होती. रविवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात १० ते १५ जण जखमी झाले आहे. या बसमध्ये एकूण ४१ प्रवासी प्रवास करत होते. शिवशाही बसच्या अपघातांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे.