मुंबई, 08 ऑक्टोबर : तुम्ही शेतकऱ्यांना रडवलं आता तुम्हाला रडण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली. तसंच सूडाचं राजकारण कुणी करणार असेल तर आम्ही सोडणार नाही. मात्र 2000 मध्ये बाळासाहेबांच्या अटकेवेळी आघाडीनं सूडाचं राजकारण केलं नव्हतं का अस...