पुणे, 13 ऑगस्ट : पुणे शहरालगत उभारण्यात आलेल्या लवासा सिटीमुळे निसर्गाचा मुडदा पडल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडेंनी केला. मात्र, सांगलीच्या महापुराबद्दल बोलताना भिडेंना अचानक लवासाची आठवण का झाली? असा सवाल विचारला जात आहे. निसर्गाचं रौद्ररुप पाहून भिडे गुरुजींना आपल्या भावनांचा बांध रोखता आला नाही. परंतु, पूरसदृश्य स्थितीमध्ये भिडे गुरूजी आणि त्यांचे धारकरी नेमके कुठे आहेत असे प्रश्न विचारले जात होते.