नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. याबाबत आज संध्याकाळी 5 वाजता शरद पवार आणि सोनिया गांधी यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या दरम्यान पवारांनी सत्ता स्थापनेसंदर्भात केलेल्या विधानामुळं आणखीनच चर्चांना उधाण आलं आहे. पवारांना महाराष्ट्रात सरकार स्थापन केव्हा होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते त्यांनाच विचारा असं उत्तर त्यांनी दिलं.