सिंधुदुर्ग, 14 ऑक्टोबर : मी शिवसेनेसोबत कटुता संपवायला तयार आहे, पण शिवसेनेनंही त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असं महत्वाचं विधान नारायण राणेंनी केलं आहे. न्यूज१८ लोकमतला त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. माझा भाजप प्रवेश ही केवळ औपचारिकता आहे, उद्याच मुख्यमंत्र्यांच्या सभेत आमच्या सर्वांचा रितसर भाजप प्रवेश होईल, असंही ते म्हणाले. भाजप मला जिथे ठेवेल तिथे राहीन, दिल्लीत की महाराष्ट्रात हे फडणवीस ठरवतील, असं सूचक वक्तव्यही राणेंनी केलं..