- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
सेकंड हँण्ड कार, दुचाकी खरेदी करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी, फसवणूक टाळण्यासाठी रहा अलर्ट

सेकंड हॅण्ड वाहने खरेदी करण्याच्या व्यवहारात फसवणूक होण्याच्या घटना वाढत आहेत. वापरलेल्या कार, बाईक इत्यादी खरेदी करण्यासाठी प्रयत्नात असलेल्या लोकांची कशी फसवणूक होते पहा.
- News18 Lokmat
- Last Updated: Mar 25, 2023 02:50 PM IST
नवी दिल्ली, 25 मार्च : जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती वापरलेली कार किंवा बाईक घेण्याचा विचार करत असेल तर थोडी खबरदारी बाळगा. सेकंड हॅण्ड वाहने खरेदी करण्याच्या या व्यवहारात भामट्या लोकांनी सर्वत्र जाळं पसरलं आहे. वापरलेल्या कार, बाईक किंवा ट्रॅक्टर इत्यादी खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लोकांची फसवणूक होत आहे. फसवणुकीबाबत जनजागृती मोहिमेत आम्ही तुम्हाला इंदूरमधील घटनेबद्दल सांगणार आहोत. तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे कारण अशी घटना तुमच्याशी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी कधीही घडू शकते.
इंदूरमधील तेजाजीनगर चौकाजवळ राहणारा अभिषेक सिंह हा अशाच भामट्यांचा बळीचा बकरा ठरला आहे. त्याचे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अभिषेक जरी बाईक घेण्याचा विचार करत नव्हता, पण तरीही तो फसवणुकीचा बळी ठरला.
'आर्मी वाल्या'चा फोन आला
जागरण डॉट कॉमच्या बातमीनुसार, अभिषेकने पोलिसांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे की सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्याला फोन आला. फोन करणाऱ्याने आपले नाव राजेश असल्याचे सांगून स्वत:ला लष्करातील अधिकारी असल्याचे सांगितले आणि त्याची बदली झाली असल्याचे सांगितले. त्याच्याकडे भरपूर सामान असल्याने त्याला ते विकायचे आहे. बहुतेक वस्तू विकल्या गेल्या आहेत, फक्त बाईक शिल्लक आहे. त्याने अभिषेकला सांगितले की बाईक जवळजवळ नवीन आहे आणि त्याला ती लवकरात लवकर विकायची आहे.
लष्कर अधिकारी असल्याचे बतावणी करून काही फसवणुकी गेल्या काही दिवसात केल्या गेल्या आहेत. त्या व्यक्तीने दुचाकीची छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर पोस्ट केली आणि अभिषेकला आय कार्डही पाठवले, जेणेकरून त्याला काही शंका येणार नाही. हे आय-कार्ड एका सैन्यदलातील व्यक्तीचे होते. एकतर ते आय-कार्ड कुठेतरी चोरीला गेले असावे किंवा ते बनावट बनले असावे.
सौदा आवडला आणि फसला
असे बरेचदा घडते की लोकांना स्कूटर, बाईक किंवा कारचा सौदा आवडतो. याचे कारण त्याची कमी किंमत आणि चांगली स्थिती हे असते. वाहन कमी वापरलेले आहे आणि मूळ किमतीच्या निम्म्याहून कमी किंमतीत मिळणार होते. त्यानं पाठवलेली दुचाकीची चित्रे पाहिल्यानंतर अभिषेकलाही असेच वाटले आणि त्याने व्यवहार केला. त्याला सर्व पसंत पडल्यानंतर पैशांची मागणी करू लागला. भामट्यानं सांगितलं की, लष्कराच्या वाहनातून वाहन तुमच्या घरी पोहोचवले जाईल. पण तुम्हाला अर्धे पैसे अगोदर भरावे लागतील आणि बाकीचे वाहन मिळाल्यानंतर दिले तरी चालतील.
हे वाचा - आली लहर केला कहर! एकटेपणाने कंटाळला, 300 मुलींना दिला धोका, प्रेमासाठी नाही तर..
या सौद्यात एखाद्या व्यक्तीने त्यांना पैसे दिले, की मग तो व्यक्ती अगदी वाईटरित्या अडकतो. जर जास्त पैसे सुरुवातीला दिले नाही तरी देखील फसवणूक होते. हे भामटे असे जाळे टाकतात की पुढला माणूस एकदा पैसे दिले की, पुढे देतच राहतो. हे एका उदाहरणासह समजून घ्या.
जर तुम्ही बाइकची डील 50 हजार रुपयांमध्ये कन्फर्म केली, तर आधी तुम्हाला 25 हजार रुपये मागितले जातील. जर तुम्ही वाटाघाटी केल्या आणि कमी अॅडव्हान्स रक्कम देण्याची ऑफर दिली तर ठीक आहे, अन्यथा काही प्रकरणांमध्ये निम्मी रक्कम द्यायला लोक तयार होतात. चला असे गृहीत धरू की तुम्ही आधी फक्त 5 हजार रुपये दिले आहेत आणि उरलेले पैसे तुम्हाला गाडी मिळाल्यावर देण्याविषयी तुमचे बोलणे झाले. यावर ही भामटी लोकं थोडे-फार नाही-होय म्हणत 5 हजार घेणेही मान्य करतील. ते तुमच्याकडून 5 हजार रुपये घेतील आणि नंतर सर्व प्रकारच्या गोष्टी बनवायला सुरू करतात आणि बाइक देण्याविषयी काहीही सबबी सांगण्यास सुरुवात करतात. मग ते तुम्हाला सांगतील की, जर तुम्ही 5000 रुपये अधिक दिले, तर मी वाहन दुसऱ्या कोणाकडून तरी तुमच्याकडे पाठवण्याची व्यवस्था करतो किंवा आम्ही स्वतः बाइक देण्यासाठी तुमच्या घरी येऊ. असे खेळ करत ते तुमच्याकडून भरपूर पैसे काढतात. अभिषेकच्या बाबतीतही असेच झाले होते.
खरं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण अभिषेककडून त्या भामट्याने तब्बल 16 वेळा पैसे घेतले. या 16 वेळा त्याने एकूण 75 हजार रुपये दिले, या आशेने की त्याला बाईक मिळेल, अन्यथा त्याला त्याचे पैसे परत मिळतील. काही दिवसानंतर ज्या फोन नंबरवरून तो भामटा अभिषेकच्या संपर्कात होता, तो फोन नंबर आपोआप बंद झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी अभिषेकला आपली फसवणूक झाल्याचे समजले.
हे वाचा - ऑनलाईन खरेदी करताय? जरा थांबा! दोघांना लाखो रुपयांना बसला गंडा
ही एक घटना उदाहरण म्हणून आहे. तुमच्या अवती-भोवती, ऑनलाईन साईटवरही अशा भामट्या लोकांच्या टोळ्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना खूप काळजी घ्यावी, कारण एकदा पैसे गेल्यानंतर आपल्यावर पश्चाताप करत बसण्याची वेळ येते.