मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ऑनलाईन खरेदी करताय? जरा थांबा! दोघांना लाखो रुपयांना बसला गंडा

ऑनलाईन खरेदी करताय? जरा थांबा! दोघांना लाखो रुपयांना बसला गंडा

उत्तराखंडमध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हे करणारे नवीन मार्गाने लोकांना जाळ्यात अडकवत आहेत.

उत्तराखंडमध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हे करणारे नवीन मार्गाने लोकांना जाळ्यात अडकवत आहेत.

उत्तराखंडमध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हे करणारे नवीन मार्गाने लोकांना जाळ्यात अडकवत आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Dehradun, India

पवन सिंह कुंवर (हल्द्वानी), 25 मार्च : उत्तराखंडमध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हे करणारे नवीन मार्गाने लोकांना जाळ्यात अडकवत आहेत. स्वस्त आणि चांगलं मिळेल या लोभातून लोक फसवणुकीला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी हल्दवणी येथे  महिलेची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या महिलेल्या ऑनलाईन फ्रॉडखाली लाखो रुपयांना फसवले होते. पीडित महिलेने लाखोंची रक्कम परत मिळावी, अशी विनंती पोलिसांकडे केली होती. ही घटना ताजी असतानाच एका पंडिंताला आयफोन खरेदी करताना 15,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंडितांनी ऑनलाइन एक जाहिरात पाहिली, ज्यामध्ये अॅपल कंपनीचा iPhone Max Pro मोबाईल केवळ 15 हजार रुपयांमध्ये उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. त्या फोनची खरी किंमत सुमारे एक लाख 20 हजार रुपये आहे. एवढा स्वस्त फोन कसा मिळत आहे म्हणून त्यांनी हा मोबाईल त्या लिंकवरून मागवला. कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय नसल्याने त्यांच्याकडून मोबाईलची किंमत म्हणजेच 15 हजार रुपये आधीच घेतले होते.

लॉरेन्स बिश्नोई ते हाशिम बाबा 'हे' आहेत भारतातील टॉप 10 गँगस्टर 

मोबाईल घरी पोहोचला तेव्हा फोन बॉक्समध्ये एक डमी होता. हे पाहून पंडितांना धक्का बसला. यावर त्यांच्या लक्षात आलं आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत पोलिसांना संपूर्ण माहिती दिली. तो व्यवसायाने पंडित असल्याचे तरुणाने सांगितले.

सेकंड हँड वस्तू पुरवणाऱ्या एका वेबसाइटवर त्याला आयफोन खूप स्वस्त मिळत असल्याचे दिसले. त्यानंतर त्याने दिलेल्या नंबरवर कॉल केला, तर एका तरुणीने सांगितले की, वेबसाइटवर काही जुने फोन आहेत, त्यामुळे ते स्वस्तात मिळतात.

तीन वर्षांपूर्वीच्या हिरे चोरीचा छडा, आंध्र प्रदेश ते गोवा; जाणून घ्या कसा झाला तपास?

पंडितांना वाटलं हे खर असेल म्हणून ते लिंकवर जाऊन पुढची प्रोसेस करत गेले आणि 15 हजार रुपये देऊन आयफोन मागवला. मोबाईल घरी आल्यावर बॉक्समध्ये डमी फोन आला. हे पाहून पंडितांची पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन बंद असल्याचे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्याची तक्रार घेऊन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

First published:
top videos

    Tags: Iphone, Local18, Online fraud