परंतु मैत्रीच्या पवित्र्य नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हाच दिवस का निवडला गेला असावा? यामागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत.
फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात पॅराग्वेपासून झाल्याचं सांगितलं जातं. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा 1958 मध्ये मांडण्यात आला होता.
असं म्हटलं जातं की अमेरिकेत 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.
खून झालेल्या व्यक्तीचा एक खास मित्र होता, त्याला ही घटना कळताच त्यानंही निराश होऊन आत्महत्या केली.
दोन मित्रांमधील अशी मैत्री पाहून अमेरिकन सरकारनं ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू हा दिवस प्रचलित झाला.