जाहिरात
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / Vande Bharat : विमानापेक्षा महाग तिकीट, सर्वात कमी स्पीड! मुंबई-गोवा वंदे भारतच्या 'या' गोष्टी माहिती आहेत?

Vande Bharat : विमानापेक्षा महाग तिकीट, सर्वात कमी स्पीड! मुंबई-गोवा वंदे भारतच्या 'या' गोष्टी माहिती आहेत?

Vande Bharat : विमानापेक्षा महाग तिकीट, सर्वात कमी स्पीड! मुंबई-गोवा वंदे भारतच्या 'या' गोष्टी माहिती आहेत?

वंदे भारत एक्स्प्रेसनं गोव्याला जाण्याचं मुंबईकरांचं स्वप्न आता पूर्ण होतंय. पण, हा प्रवास तितका फायद्याचा नाही.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 जून :  भारतीय रेल्वेची सर्वात आधुनिक आणि वेगवान ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसनं गोव्याला जाण्याचं मुंबईकरांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगावपर्यंतची वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवार (27 जून) सुरू होतीय.  ही वंदे भारत एक्स्प्रेस इतरांपेक्षा अनेक कारणांमुळे वेगळी आहे. काय आहे वेगळेपण? मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस ही आठवड्यातून फक्त 3 दिवस धावणार आहे. 8 डबे असलेली ही देशातील सर्वात संथ वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे आहे. त्याची स्पीड 57 किलो मीटर प्रती तास आहे. या रेल्वेच्या एक्झुकेटीव्ह ट्रेनचे तिकीट हे 3,535 आहे. सुमारे दहा तासांमध्ये ही रेल्वे मुंबईहून मडगावला जाणार आहे. तर याच मार्गावरील विमानाचे तिकीट 2,200 रुपये आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मान्सूनमध्ये स्पीड कमी कोकणात घाट विभाग असल्यानं सर्व रेल्वेच्या स्पीडला मर्यादा लावण्यात येते. 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत ही रेल्वे मान्सूनच्या टाईमटेबलनुसार चालते. या कालावधीमध्ये मुंबई-मडगाव वंदेभारत एक्स्प्रेसची स्पीड ताशी 57 किलोमीटर असेल. ही देशातील सर्वात संथ वंदेभारत असणार आहे. अन्य वंदे भारतची स्पीड ही साधारण 75 किलोमीटर आहे. आठवड्यातून 3 वेळा धावणार वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी ते मडगाव दरम्यान सोमवार, बुधवार आणि शुक्रवार धावणार आहे. हाटे 05.25 वाजता सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि  मडगावला दुपारी 3.30 वाजता पोहोचेल. तर मडगावहून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 12.20 वाजता सुटेल आणि 22.25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. गणपतीसाठी कोकणात जाऊचा? सेंट्रल रेल्वेकडून 156 स्पेशल गाड्या कुठे असेल स्टॉप? ही ट्रेन दादर,  ठाणे,  पनवेल , रोहा , खेड,  रत्नागिरी,  कणकवली आणि थिविम येथे थांबणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात