मुंबई, 24 जून : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सेंट्रल रेल्वेनं दिलासा देणारी बातमी दिलीय. गणेशोत्सवानिमित्त खास 156 गाड्या सोडल्या जाणार आहेत. रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, मडगावला मुंबई, पनवेल, पुण्याहून स्पेशल ट्रेन्स असणार आहेत. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ट्रेन्स असतील. यासाठी बूकिंग २७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा एपवरून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं बूकिंग करता येणार आहे. यासाठी स्पेशल चार्ज असेल. स्पेशल गाड्यांचे थांबे, वेळ यासाठी NTES एप किंवा www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावरून माहिती मिळेल. सेंट्रल रेल्वेकडून १५६ गणपती स्पेशल ट्रेन कोकणात धावणार आहेत. यात सर्वाधिक मुंबई-सावंतवाडी रोड डेली स्पेशल एकूण ४० गाड्या या काळात असतील. सीएसएमटीवरून ००.२० वाजता सुटणारी ट्रेन दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीत पोहोचेल. या गाडीच्या १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात २० फेऱ्या होतील. तर सावंतवाडीहून दुपारी ३ वाजून दहा मिनिटांनी सुटणारी ट्रेन सीएसएमटी स्थानकात दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. दोन्ही गाड्या दादर, ठाणे, पनवेल, मानगाव, वीर, खेड, चिपळून, सावरडा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळला थांबतील. Metro vs Train: मेट्रोचा प्रवास असतो एकदम आरामात, पण ट्रेनमध्ये सतत लागतात धक्के, याचं कारण काय? लोकमान्य टिळक टर्मिनसवरून कुडाळला गणेशोत्सवात २४ स्पेशल ट्रेन्स असणार आहेत. LTTवरून 01167 ही गाडी 22.15 वाजता सप्टेंबरमध्ये 13, 14, 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28 या तारखांना सुटेल. तर ऑक्टोबरमध्ये १ आणि दोन तारखेला सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता कुडाळला पोहोचेल. तर 01168 ही ट्रेन कुडाळमधून 14, 15, 20, 21, 22, 25, 26, 27, 28, 29 सप्टेंबर आणि २,३ ऑक्टोबरला दहा वाजता सुटेल आणि रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी LTT स्थानकात पोहोचेल. पुणे - कुडाळ मार्गावरही ६ स्पेशल गाड्या धावणार आहेत. यात १५,२२ आणि २९ सप्टेंबरला गाड्या पुण्याहून सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी सुटतील. त्या कुडाळला दुसऱ्या दिवशी दहा वाजता पोहोचतील. तर कुडाळवरून १७,२४ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजून ५ मिनिटांनी सुटणारी गाडी पुण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. करमाली-पनवेल-कुडाळ (Weekly) 6 गाड्या गणेशोत्सव काळात असणार आहेत. यात १६, २३, ३० सप्टेंबरला करमाळीहून दुपारी पावणे तीनच्या सुमार सुटणारी गाडी मध्यरात्री दोन वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. तर तिथून ५ वाजता सुटणारी गाडी दुपारी दोन वाजता कुडाळला पोहोचेल. दिवा रत्नागिरी मेमू स्पेशल (Daily) गणेशोत्सव काळात ४० गाड्या या मार्गावर धावतील. दिवा इथून सकाळी सात वाजून १० मिनिटांनी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात स्पेशल गाडी सुटेल. ही गाडी रत्नागिरीत दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. तर रत्नागिरीतून दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी सुटणारी गाडी रात्री दहा वाजून ४० मिनिटांनी दिवा स्थानकात पोहोचेल. मुंबई मडगाव स्पेशन (daily) गणेशोत्सवात एकूण ४० गाड्या या मार्गावर धावणार असून सीएसएमटीवरून सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सुटणारी गाडी मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. तर मडगावरून पहाटे तीन वाजून १५ मिनिटांनी मडगाववरून सुटणारी गाडी सीएसटीएमला सायंकाळी पाच वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. या गाड्या १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.