मुंबई, 12 जुलै : आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामासाठी दररोज घराबाहेर पडावं लागतं. आपल्यासोबत घरातील इतर सदस्यांनाही कामानिमित्त बाहेर जावं लागतं. कुणी शाळेत, कुणी कॉलेजला, कुणी नोकरीला तर कुणी व्यवसायानिमित्त प्रवास करत असतात. बाहेर हवामान कसंही असो, पण तुम्हाला कामावर जावंच लागतं, कारण हवामानामुळं काम थांबू शकत नाही. सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सूनमुळे (Monsoon News) पाऊस पडत आहे, त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, परंतु पावसामुळे लोकांना सर्वात मोठी समस्या भेडसावत आहे आणि ती आहे म्हणेज ट्राफिक जामची अर्थात वाहतूक कोंडीची (Traffic jam in Rain) समस्या. म्हणूनच जर तुम्ही पावसाळ्यात घराबाहेर जात असाल तर वाहतूक कोंडीत अडकू नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. चला तर मग आज आपण जाणून घेऊया की पावसाळ्यामध्ये वाहतूक कोंडीत अडकू नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल… अशा प्रकारे वाहतूक कोंडीत अडकण्यापासून वाचू शकतो (How to avoid traffic Jam in Rainy season) - प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी घराबाहेर पडावं लागतं. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या वाहनातून कुठेतरी जात असाल आणि त्याचवेळी पाऊस पडला असेल किंवा पाऊस पडत असेल, तर साहजिकच सगळीकडे ट्रॅफिक जाम होते. अशा परिस्थितीत जाम टाळण्यासाठी तुम्ही गुगल मॅपची मदत घेऊ शकता. हेही वाचा- PM Ujjwala Yojana Online: सरकार मोफत देत आहे गॅस सिलेंडर, असा घ्या योजनेचा फायदा गुगल मॅपची घ्या मदत (Take help of Google Map)- वास्तविक, जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जायचे असेल, तर तुम्हाला प्रथम गुगल मॅपमध्ये तुम्हाला कुठं जायचं आहे, त्या ठिकाणाचं नाव भरावं लागेल. त्यानंतर गुगल मार्ग तुम्हाला काही मार्ग दर्शवेल. यामध्ये काही मार्ग जाम झाले असतील तर काही मार्ग खुले असतील. तुम्हाला हे पहावे लागेल की जे मार्ग तुम्हाला लाल रंगात दिसत आहेत, त्यामध्ये जाऊ नका कारण हे मार्ग जाम आहेत. पण गुगल मॅप्स तुम्हाला पर्याय म्हणून आणि जामपासून वाचवण्यासाठी दुसरा मार्ग देखील देतो, ज्याचा रंग तुम्हाला निळा दिसतो. या मार्गांची निवड करून तुम्हाला प्रवास करावा लागेल. असं असू शकते की अशा मार्गाचं अंतर थोडं जास्त असेल किंवा ते समान असेल. पण जाममध्ये अडकण्यापेक्षा थोडा लांबचा प्रवास करून वेळेवर आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचणं चांगलं. त्यामुळं पावसाळ्यात गुगल मॅपची मदत नक्की घ्या, जेणेकरून वाहतूक कोंडीतून तुमची सुटका होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.