जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PM Ujjwala Yojana Online: सरकार मोफत देत आहे गॅस सिलेंडर, असा घ्या योजनेचा फायदा

PM Ujjwala Yojana Online: सरकार मोफत देत आहे गॅस सिलेंडर, असा घ्या योजनेचा फायदा

PM Ujjwala Yojana Online: सरकार देत आहे मोफत गॅस कनेक्शन, असा घ्या योजनेचा फायदा

PM Ujjwala Yojana Online: सरकार देत आहे मोफत गॅस कनेक्शन, असा घ्या योजनेचा फायदा

PM Ujjwala Yojana Online: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून तुम्ही गॅस सिलिंडर मोफत मिळवू शकता. यासाठी तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pmuy.gov.in/index.aspx द्वारे अर्ज करू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 जुलै : आज आपण भारत सरकारच्या अशा एका खास योजनेबद्दल (Central Government Scheme) जाणून घेणार आहोत. या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PM Ujjwala Yojana). देशात अजूनही अशा स्त्रियांची संख्या जास्त आहे, ज्यांच्याकडे एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) नाही, आणि त्यांना अजूनही चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. देशातील महिला मोठ्या प्रमाणात सरकारच्या या योजनेचा लाभ घेत आहेत. त्याचा फायदा त्यांना होत आहे. आज आपण उज्ज्वला गॅस योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेमध्ये अप्लाय करून तुम्ही मोफत गॅस कनेक्शन मिळवू शकता. पीएम उज्वला योजनेचा लाभ कुणाला मिळतो? (Who gets the benefit of PM Ujwala Yojana?)- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://www.pmuy.gov.in/index.aspx ला भेट द्यावी लागेल.  या योजनेअंतर्गत सरकार दारिद्र्य रेषेखालील महिलांना एलपीजी कनेक्शन (LPG Connection) देते. या योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जातो. याशिवाय जी महिला या योजनेसाठी अर्ज करू इच्छिते, तिचं वय 18 वर्ष पूर्ण असणं महत्त्वाचं आहे. याशिवाय यापूर्वी त्या घरात उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन असू नये. या सगळ्या अटींची पूर्तता केल्यास त्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. हेही वाचा:  Hair Care Tips : रिव्हर्स हेअर वॉशिंग म्हणजे काय? केसांसाठी फायद्याचे असते की नाही? या कागदपत्रांची आहे आवश्यकता (Documents for PM Ujwala Yojana)-

  • उज्ज्वला गॅस कनेक्शनसाठी ई केवायसी (Know your customer) आवश्यक आहे.
  • BPL राशन कार्ड किंवा कोणत्याही राज्यानं जारी केलेलं राशन कार्ड, ज्यामध्ये तुम्ही दारिद्र्य रेषेखाली नाव असावं.
  • आधार कार्ड किंवा मतदान कार्डसुद्धा आवश्यक आहे.
  • बँक अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोडची माहिती द्यावी लागेल.
  • एक पासपोर्ट साइज फोटोसुद्धा द्यावा लागेल.

असा करा अर्ज (How to Apply for PM Ujwala Yojana)-

  • सुरुवातीला तुम्हाला उज्ज्वला गॅस योजनेची अधिकृत वेबसाईट https://www.pmuy.gov.in/index.aspx ला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल.
  • येथे तुम्हाला इंडेन, एचपी किंवा भारतगॅसपैकी तुम्हाला जो डिस्ट्रिब्युटरची हवा आहे, त्या डिस्टीब्युटरला निवडावं लागेल.
  • त्यानंतर वेबसाईटवर दिली गेलेली आवश्यक सर्व माहिती द्यावी लागेल.
  • डिटेल्स भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची कॉपी वेबसाईटवर अपलोड करावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल.
  • यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी होईल.
  • त्यामध्ये काही चूक नसल्यास तुम्हाला गॅस कनेक्शन दिलं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: gas , LPG Price
  • First Published :
जाहिरात
जाहिरात