- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
Airlines Extra Charges: विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा, आता ‘या’ सेवेसाठी द्यावं लागणार नाही जास्तीचं शुल्क

Extra Charges on Boarding Pass by Airlines: विमान कंपन्या बोर्डिंग पासवर प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारू शकत नाहीत, असे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिले आहे.
- News18 Lokmat
- Last Updated: Jul 23, 2022 02:59 PM IST
मुंबई, 23 जुलैः अलीकडच्या काळात विमान कंपन्या प्रवाशांकडून अनेक छुपे कर लावत असल्याची अनेक उदाहरणं समोर आलं आहे. अलीकडेच इंडिगो एअरलाईन्सनं प्रवाशांकडून क्यूट चार्ज नावानं शुल्क आकारणी केली होती. अशाच विविध तक्रारी प्रवासी करत असतात. आता विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आता बोर्डिंग पासवर प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क (Extra Charges on Boarding Pass) आकारलं जाणार नाही. हे शुल्क विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून 200 रुपये वसूल केलं जात होतं. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं (Ministry of Civil Aviation) 21 जुलै रोजी जाहीर केले की, एअरलाइन्स यापुढे विमानतळ चेक-इन काउंटरवर बोर्डिंग पास जारी करण्यासाठी अतिरिक्त रक्कम आकारू शकत नाहीत.
बोर्डिंग पाससाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारू नये-
हे लक्षात घेण्यासारखं आहे की, सध्या इंडिगो, स्पाइसजेट आणि GoFirst सारख्या विमान कंपन्या चेक-इन काउंटरवर प्रवाशाला बोर्डिंग पास जारी करू इच्छित असल्यास 200 रुपये आकारतात. एका निवेदनात मंत्रालयानं म्हटलं आहे की, विमान कंपन्या प्रवाशांकडून बोर्डिंग पास जारी करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचं कळलं आहे. ही अतिरिक्त रक्कम आदेशात दिलेल्या निर्देशांनुसार किंवा विमान नियम, 1937 च्या विद्यमान तरतुदींनुसार नाही. मंत्रालयाने सांगितले की, एअरलाइन्सना एअरपोर्ट चेक-इन काउंटरवर बोर्डिंग पास जारी करण्यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असा सल्ला देण्यात आला आहे, कारण विमान नियमांच्या नियम 135 अंतर्गत प्रदान केलेल्या दरानुसार त्याचा विचार केला जाणार नाही.
हेही वाचा- ITR Filing: शेवटचे 7 दिवस! अंतिम मुदतीपूर्वी IT रिटर्न फाइल न केल्यास होईल कारवाई
सरकारनं दंड करण्याचा दिला इशारा-
मंत्रालयाने 21 मे 2020 रोजी प्रवाशांना वेब चेक-इन करणं आणि बोर्डिंग पास घेणं बंधनकारक केलं होतं. तथापि, 9 मे, 2022 रोजी मंत्रालयानं आदेश जारी केला की एअरलाइन्सनी प्रवाशांना वेळेवर वेब चेक-इन आणि बॅग टॅग प्रिंटिंग आणि चेक-इन करण्यासाठी प्रोत्साहित, सुविधा आणि मार्गदर्शन केलं पाहिजे.
9 मे रोजीच्या आदेशानुसार अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाहीत-
मंत्रालयानं आपल्या निवेदनात असंही म्हटलं आहे की विमानतळ चेक-इन काउंटरवर बोर्डिंग पास जारी करण्यासाठी एअरलाइन्सकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याची प्रक्रिया 9 मे रोजीच्या आदेशानुसार नाही.