नवी दिल्ली, 27 एप्रिल : भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे. देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या धावतात. काही गाड्यांचा प्रवासही खूप लांब पल्ल्याचा असतो. 115,000 किलोमीटरवर पसरलेल्या विशाल नेटवर्कसह, भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. एका ट्रेनमध्ये तर प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी जवळपास 80 तासांचा प्रवास करावा लागतो. ही ट्रेन दिब्रुगड ते कन्याकुमारीपर्यंत धावते. भारतातील 7349 स्थानकांवरून दररोज 20000 हून अधिक प्रवासी गाड्या आणि 7000 हून अधिक मालगाड्या धावतात. आज आपण भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांविषयी (Long Train Journeys In India) जाणून घेऊया. हमसफर एक्सप्रेस (अगरताळा ते बंगळुरू कॅन्टोन्मेंट ) हमसफर एक्स्प्रेस आगरताळा ते बंगळुरू कॅन्टोन्मेंट दरम्यान धावते. ही ट्रेन 64 तास 15 मिनिटांत 3570 किमी अंतर कापते. प्रवासादरम्यान ही ट्रेन 28 स्थानकांवर थांबते. हमसफर एक्सप्रेस आगरताळा ते बंगळुरू छावणीला आठवड्यातून दोनदा, फक्त मंगळवार आणि शनिवारी धावते. विवेक एक्सप्रेस (दिब्रुगढ ते कन्याकुमारी) लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीत विवेक एक्सप्रेसचे नाव सर्वात वर आहे. आठवड्यातून एकदाच ही गाडी दिब्रूगड ते कन्याकुमारी धावते. सध्या ही साप्ताहिक ट्रेन भारतातील सर्वात लांब रेल्वे पल्ल्याची गाडी असून जगातील 24 वी (अंतर आणि वेळेनुसार) रेल्वे आहे. ही ट्रेन दिब्रुगढ ते कन्याकुमारी पर्यंत 50 हून अधिक स्थानकांवर थांबते. या गाडीचा प्रवास 80 तासांचा आहे, ज्यामध्ये ती 4273 किमी अंतर कापते. हिमसागर एक्सप्रेस (कन्याकुमारी ते श्री माता वैष्णोदेवी कटरा) हिमसागर एक्सप्रेस ट्रेन श्री माता वैष्णोदेवी कटरा ते कन्याकुमारी दरम्यान धावते. ही साप्ताहिक ट्रेन 12 राज्ये ओलांडते आणि 73 स्थानकांवर थांबते. ही लांब पल्ल्याची रेल्वे गाडी 3785 किलोमीटरचे अंतर 73 तासांत कापते. अमृतसर कोचुवेली एक्सप्रेस (अमृतसर ते कोचुवेली तिरुवनंतपुरम) अमृतसर कोचुवेली एक्सप्रेस दर रविवारी अमृतसर ते कोचुवेली तिरुवनंतपुरमपर्यंत धावते. ही ट्रेन 7 राज्यांमधून जाते आणि 25 स्थानकांवर थांबते. या ट्रेनला 3597 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 57 तास लागतात. हे वाचा - तुमचं मूल अजून लाळ गाळतंय का? समज-गैरसमज खूप आहेत, नेमकी माहिती समजून घ्या तिरुवनंतपुरम-सिलचर सुपरफास्ट एक्सप्रेस - तिरुवनंतपुरम-सिलचर सुपरफास्ट एक्सप्रेस ही देखील साप्ताहिक ट्रेन आहे. तिला पूर्वी तिरुअनंतपुरम सेंट्रल-गुवाहाटी सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हटले जात असे. यानंतर 21 नोव्हेंबर 2017 रोजी रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात आला आणि तेव्हापासून ही ट्रेन तिरुअनंतपुरम-सिलचर सुपरफास्ट एक्स्प्रेस बनली आहे. ही ट्रेन 76 तास 35 मिनिटांमध्ये 3932 किमी अंतर कापते आणि 54 स्थानकांवर थांबते. हे वाचा - बॉडी स्ट्रेचिंग करणे का गरजेचे आहे? सर्वात महत्त्वाची ही 5 कारणं जाणून घ्या नवयुग एक्सप्रेस (मंगलोर सेंट्रल ते जम्मू तवी) नवयुग एक्स्प्रेसला मंगलोर सेंट्रल ते जम्मू तवीपर्यंत पोहोचण्यासाठी 4 दिवस लागतात. ही ट्रेन 59 स्थानकांवर थांबते आणि 4 दिवसांत 3685 किलोमीटरचे अंतर कापते. नवयुग किंवा न्यू-एरा एक्सप्रेस ही एक साप्ताहिक ट्रेन आहे जी 15 राज्यांमधून जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







