Indian Railways: तुम्हाला हवं ते IRCTC ने ओळखलं; तिकीट बुकींग नियमात केला मोठा बदल

Indian Railways: तुम्हाला हवं ते IRCTC ने ओळखलं; तिकीट बुकींग नियमात केला मोठा बदल

IRCTC Ticket Booking Rule: तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता तुम्ही एका महिन्यात 24 रेल्वे तिकीट बुक करू शकता.

  • Share this:

मुंबई, 6 जून : तुम्ही ट्रेनने (Indian Railways) प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. IRCTC ने रेल्वे तिकीट बुक करण्याच्या नियमात बदल केला आहे. IRCTC वरून तिकीट बुक करणाऱ्यांना मोठी सुविधा मिळत आहे. या नवीन नियमानुसार आता तुम्ही एका महिन्यात पूर्वीपेक्षा जास्त तिकिटे बुक करू शकता. जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठी मदत होणार आहे.

वास्तविक, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने एक नवीन नियम बनवला आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card Link With IRCTC) आयआरसीटीसी (IRCTC नवीन नियम) शी लिंक केले असेल तर तुम्हाला मोठा फायदा मिळणार आहे.

आता तिकीट बुकिंगचे नियम बदलले

पूर्वी तुम्ही IRCTC खात्यातून (IRCTC Account) एका महिन्यात जास्तीत जास्त 6 तिकिटे ऑनलाइन बुक करू शकता. परंतु, जर तुम्ही IRCTC आयडी आधार कार्डशी लिंक केला असेल तर तुम्ही एका महिन्यात 12 तिकिटे बुक करू शकता. पण आता IRCTC ने या नियमात मोठा बदल केला आहे. आता तुम्ही एका आयडीने एका महिन्यात 24 तिकिटे बुक करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड IRCTC शी लिंक केले नसेल तरीही तुम्ही एका महिन्यात 12 तिकिटे बुक करू शकता.

Unnao : रात्री घरातून बेपत्ता झाली मुलगी, दुसऱ्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर आढळलं भयानक दृश्य

आधार लिंक कसे करावे

1. यासाठी प्रथम IRCTC च्या अधिकृत ई-तिकीटिंग वेबसाइट irctc.co.in वर जा.

2. आता यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

3. आता होम पेजवर दिसणार्‍या 'My Account section' वर जाऊन 'Aadhaar KYC' वर क्लिक करा.

4. यानंतर, पुढील पृष्ठावर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि 'Send OTP' वर क्लिक करा.

5. आता तुमच्या आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. हा OTP टाका आणि पडताळणी करा.

6. आधारशी संबंधित माहिती पाहिल्यानंतर खाली लिहिलेल्या 'Verify' वर क्लिक करा.

7. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल की KYC तपशील यशस्वीरित्या अपडेट झाला आहे.

प्रोफाइलची आधारशी पडताळणी करणे आवश्यक

तिकीट बुक करण्‍यासाठी, प्रवाशाने आधारशी आपले प्रोफाईल पडताळणे फार महत्वाचे आहे. हे मास्टर लिस्ट अंतर्गत 'My Profile' टॅबमध्ये दिलेले आहे. तिकीट बुक करण्यापूर्वी, येथे प्रवाशाचे नाव आणि आधार कार्ड तपशील देऊन मास्टर लिस्ट अपडेट करा.

Published by: Rahul Punde
First published: June 6, 2022, 5:34 PM IST

ताज्या बातम्या