मराठी बातम्या /बातम्या /देश /Unnao : रात्री घरातून बेपत्ता झाली मुलगी, दुसऱ्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर आढळलं भयानक दृश्य

Unnao : रात्री घरातून बेपत्ता झाली मुलगी, दुसऱ्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर आढळलं भयानक दृश्य

एक 13 वर्षांच्या मुलगी रविवारी रात्री अचानक गायब झाली होती. यानंतर तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला.

एक 13 वर्षांच्या मुलगी रविवारी रात्री अचानक गायब झाली होती. यानंतर तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला.

एक 13 वर्षांच्या मुलगी रविवारी रात्री अचानक गायब झाली होती. यानंतर तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला.

उन्नाव, 6 जून : उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) रविवारी रात्री झालेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. उन्नाव येथे रात्री उशिरा एक मुलगी घरातून बेपत्ता (Girl Missing) झाली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह (Dead Body) तिच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळावर आढळला. या मुलीच्या मानेसह शरीरावर इतर ठिकाणी अनेक जखमा आढळल्या आहेत. तर या घटनेनंतर मुलीच्या परिवाराने वेगळाच दावा केला आहे.

काय आहे घटना -

उन्नावमध्ये रेल्वे लाईनवर आढळलेल्या एका मुलीच्या मृतदेहाने खळबळ उडाली आहे. या मुलीच्या नातेवाईकांनी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्यानंतर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप गावातीलच एका तरुणावर लावला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

माहितीनुसार, एक 13 वर्षांच्या मुलगी रविवारी रात्री अचानक गायब झाली होती. यानंतर तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे मुलगी गायब झाल्याची तक्रार केली. मात्र, सोमवारी सकाळी गावापासून सुमारे 1 किमी अंतरावर असलेल्या उन्नाव बालामाऊ रेल्वे मार्गावर रुळाच्या बाजूला मुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर एकच खळबळ उडाली.

दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला (Forensic Team) बोलावून तपास केला. पोलिसांनी सांगितले की, मृत मुलगीच्या कुटुबीयांच्या तक्रारीच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.

हेही वाचा - लग्नानंतर 2 आठवड्यातच नवरी 3 मुलांची आई असल्याचं समजलं; संपूर्ण सत्य जाणून पती शॉक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनाच्या अहवालाच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, मृत मुलीच्या काकाने गावातीलच एका तरुणावर बलात्काराचा संशय व्यक्त करण हत्येचा आरोप केला आहे. त्यांनी गावातील एका तरुणावर गळा दाबून मुलीला खंब्याला आपटून तिचा खून करण्यात आला, असा आरोप गावातील तरुणावर केला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चारही आरोपींची चौकशी करत आहे. तसेच यासाठी वेगवेगळी पथके नेमण्यात आली आहेत.

First published:
top videos

    Tags: Dead body, Girl death, Up crime news