नवी दिल्ली, 21 जून : सध्याच्या काळात प्रवासासाठी (Traveling) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवासी रेल्वेला (Railway) पसंती देतात. देशभरात लोहमार्गाचं मोठं जाळं आहे. रोज लाखो प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी भारतीय रेल्वे विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेनं (Indian Railway) ऑनलाइन माध्यमातून सुविधा पुरवण्यास सुरुवात केली आहे. दूरच्या प्रवासाला जाण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींचं नियोजन करतो. त्यात तिकीट बुकिंग (Ticket Booking) हा महत्त्वाचा भाग असतो. देशात रोज लाखो नागरिक रेल्वेनं प्रवास करत असल्यामुळे हजारो ट्रेन्स असूनही अनेकदा कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचणी येतात. प्रवाशांची ही अडचण ओळखून रेल्वे विभागानं इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीची (IRCTC) वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून तिकीट बुकिंगपासून ते ट्रेनच्या अपडेटपर्यंत (Train Update) अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ऑनलाइन सुविधेच्या माध्यमातून बुक केलेलं तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता आहे की नाही हेदेखील जाणून घेऊ शकता. याविषयी माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. रेल्वेचं तिकीट बुक केलं म्हणजे तिकीट कन्फर्म झालं असं नाही. अशा परिस्थितीत तिकीट कन्फर्म (Confirm) होण्याची शक्यता किती आहे हे अगदी सहजपणे जाणून घेणं शक्य आहे. प्रतीक्षेत असलेलं तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे पीएनआर क्रमांक (PNR Number) असणं आवश्यक आहे. या क्रमांकाच्या आधारे आणि सोप्या प्रक्रियेच्या माध्यमातून तिकिटाबाबतची सर्व माहिती मिळवता येते. तुम्हाला हवं ते IRCTC ने ओळखलं; तिकीट बुकींग नियमात केला मोठा बदल तिकीट कन्फर्मेशनबाबत माहिती मिळवण्यासाठी सर्वप्रथम `आयआरसीटीसी`च्या वेबसाइटवर जावं. त्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावं. लॉगिन केल्यावर एक पेज ओपन होईल. त्यावर तुमचा पीएनआर क्रमांक टाकावा आणि `Get Status` वर क्लिक करावं. त्यानंतर स्क्रोल डाउन करून खालच्या बाजूला यावं. तिथे `Click Here to Get Confirmation Chance` वर क्लिक करावं. त्यानंतर तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता किती आहे हे समजू शकेल. रेल्वेच्या बहुतांश सेवा ऑनलाइन (Online) झाल्याने त्याचा फायदा प्रवाशांसोबतच कर्मचाऱ्यांना होत आहे. आता आयआरसीटीसीने आपल्या युझर्ससाठी एका महिन्यात ऑनलाइन तिकीट बुक करण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. आता तुम्ही आयआरसीटीसी आयडीशी आधार कार्ड (Aadhar Card) लिंक करून एका महिन्यात 24 तिकिटं बुक करू शकता. तसंच रेल्वेच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ट्रेनचे अपडेटही तपासू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







