नवी दिल्ली, 5 जुलै : स्वस्त, मस्त आणि सुरक्षित प्रवासासाठी लोकं नेहमी रेल्वेला प्राधान्य देतात. मात्र, अनेकदा तिकीट (Railway Ticket) न मिळाल्याने प्रवाशांची निराशा होते. पण, यापुढे आता असं होणार नाही. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइटद्वारे तत्काळ ट्रेनचे तिकीट बुक करण्याची सुविधा प्रदान करते. ज्या लोकांना आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करावा लागतो किंवा रेल्वे तिकीट बुक करण्यास उशीर झाल्यामुळे आरक्षण मिळत नाही, अशा लोकांसाठी तत्काळ तिकीट बुक (Tatkal Ticket Booking) करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांना तातडीने पर्याय निवडणे भाग पडते. पण, तत्काळमध्ये तिकीट बुक केल्याने तुम्हाला आरक्षण मिळेलच असे नाही. अनेक वेळा तत्काळ तिकीट बुक करूनही आरक्षण मिळत नाही, असेही घडते. AC क्लाससाठी तत्काळ बुकिंगची वेळ सकाळी 10:00 वाजता सुरू होते. नॉन-एसी म्हणजेच स्लीपर क्लासचे बुकिंग सकाळी 11.00 वाजल्यापासून सुरू होते. आज आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तत्काळ पर्यायाने तिकीट बुक केल्यास, तुमचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. मास्टर लिस्ट तयार करा तुम्हालाही तत्काळ तिकिटे बुक करायची असल्यास, तत्काळ बुकिंग सुरू होण्यापूर्वी तुम्ही एक मास्टर लिस्ट बनवावी. IRCTC वेबसाइटवर लॉग इन करून तुम्ही मास्टर लिस्ट तयार करू शकता. तुम्हाला मास्टर लिस्टमध्ये प्रवासाची यादी बनवावी लागेल. यामध्ये तुम्हाला प्रवासाशी संबंधित आवश्यक माहिती टाकावी लागेल. जर तुम्ही बुकिंग सुरू होण्यापूर्वी प्रवासाशी संबंधित सर्व माहिती भरली असेल, तर तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर तुम्हाला ही माहिती टाकण्यात वेळ वाया घालवावा लागणार नाही. बुकिंग सुरू झाल्यानंतर तुम्हाला थेट मास्टर लिस्ट निवडावी लागेल. तुम्ही भरलेली प्रवास यादी असेल. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल. समोरून ट्रेन येत होती, रेल्वे कर्मचाऱ्याने जीव धोक्यात घातला पुढे काय झालं video मास्टर लिस्ट कशी वापरायची सर्व प्रथम IRCTC वेबसाइटवर जा. वेबसाइटवरील ‘My Account’ वर जा आणि ‘My Profile’ वर क्लिक करा. येथे तुम्हाला ‘Add/modify Master List’ चा पर्याय दिसेल. येथे प्रवाशाचे नाव, जन्मतारीख, लिंग, बर्थ, भोजन इत्यादी प्रविष्ट करा. त्यानंतर तुम्ही ‘Submit’ बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे प्रवाशांची मास्टर लिस्ट तयार होईल. तिकीट बुक करताना ‘My Passenger List’ वर जा आणि थेट कनेक्ट करा. नंतर पेमेंट पर्यायांपैकी एक निवडा आणि पेमेंट करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







