Home /News /national /

Indian railway : समोरून ट्रेन येत होती, रेल्वे कर्मचाऱ्याने जीव धोक्यात घालून त्या व्यक्तीचा वाचवला जीव; पहा थरारक video

Indian railway : समोरून ट्रेन येत होती, रेल्वे कर्मचाऱ्याने जीव धोक्यात घालून त्या व्यक्तीचा वाचवला जीव; पहा थरारक video

भारतीय रेल्वेकडून (Indian railway) एक व्हिडिओ (video) ट्विट (twitter) करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (video social media) जोरदार व्हायरल (viral video) होत आहे

  नवी दिल्ली, 24 जून :  भारतीय रेल्वेकडून (Indian railway) एक व्हिडिओ (video) ट्विट (twitter) करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (video social media) जोरदार व्हायरल (viral video) होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. रुळावर पडलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचारी (railway Staff) धावला आणि ट्रेन येण्यापूर्वी त्याला बाहेर काढले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुटका केल्यानंतर काही सेकंदातच वेगात असलेली एक ट्रेन (train track) त्याच रुळावरून गेली. रेल्वे मंत्रालयाने (railway ministery) या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, तो खूपच व्हायरल होत आहे.

  रेल्वे स्थानकावरील 24-सेकंदाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, रेल्वे कर्मचारी एच सतीश कुमार येणार्‍या मालगाडीला झेंडा दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्मकडे जाताना दिसत आहेत. त्यांनी अचानक मागे वळून पाहिल्यावर त्याला कळले की कोणीतरी रुळावर पडले आहे. क्षणाचाही विलंब न करता ते ताबडतोब फलाटाच्या दिशेने धावले त्यांनी थेट रुळावर उडी मारत ट्रेन येण्यापूर्वीच सतीश यांनी त्या व्यक्तीला रुळावरून बाहेर काढले. काही सेकंदात ट्रेन तिथून पुढे गेली. सतीश यांनी त्यांना योग्य वेळी वाचवले नसते तर त्या व्यक्तीचा जीव गेला असता, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

  हे ही वाचा : Sanjay Raut Shiv Sena : बंडखोर आमदारांचे संख्याबळ कागदावर, मुंबईत आल्यावर आमदारांची भूमिका वेगळी असेल

  सीसीटीव्ही फुटेज पाहून तुम्हीही थक्क व्हाल

  सतीश कुमार यांना काही सेकंद उशीर झाला असता तर सतीश आणि त्या व्यक्तीची ट्रेनची धडक बसली असती. हा माणूस चुकून पडला की जाणूनबुजून रेल्वे ट्रॅकवर उडी मारली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करताना रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, एका व्यक्तीला वाचवण्यासाठी ऑन ड्युटी कर्मचाऱ्याने केलेल्या धाडसी कृतीमुळे जीव वाचला. एच सतीश कुमार यांच्यासारख्या धाडसी आणि मेहनती कर्मचाऱ्यांचा भारतीय रेल्वेला अभिमान आहे आणि त्यांच्या शौर्याचा अभिमान आहे. दरम्यान हा व्हिडिओ मोठ्या व्हायरल झाल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

  हे ही वाचा : गुजरात दंगल प्रकरण : पंतप्रधानांना मोठा दिलासा; मोदींविरोधातील ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

  दरम्यान एकाने ट्वीटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे, ते म्हणाले कि, भेटा आमच्या खऱ्या आयुष्यातील सुपर हिरो एच सतीश कुमार ज्यांनी एक मौल्यवान जीव वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उडी मारली. एकाठिकाणी काही लोक देशांच्या संपत्तीचा नाश करणारे आहेत तर एका ठिकीणी शूर कर्मचारी काम करताना दिसत आहेत.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Indian railway, Shocking video viral, Social media, Social media viral, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या