- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
expressway : दिल्ली बडोदा मुंबई एक्सप्रेस वे लवकरच होणार सुरू, किलोमीटरला एवढा भरावा लागेल टोल

दिल्ली बडोदा मुंबई (डीव्हीएम) या एक्सप्रेस वेचा राजस्थानमधील दौसापर्यंतचा भाग 12 फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी सुरू आहे.
- News18.com
- Last Updated: Feb 8, 2023 04:17 PM IST
मुंबई, 08 फेब्रुवारी : दिल्ली-बडोदा-मुंबई (डीव्हीएम) या एक्सप्रेस वेचा राजस्थानमधील दौसापर्यंतचा भाग 12 फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे गुरुग्राममधील सोहना ते राजस्थानमधील दौसापर्यंत एक्स्प्रेस वेने प्रवास करता येणार आहे. सध्या या एक्स्प्रेस वेवरून दररोज 25 ते 30 हजार वाहने ये-जा करतील, असा अंदाज आहे. या वाहनांसाठी टोलदेखील निश्चित करण्यात आला आहे.
दिल्ली-बडोदा-मुंबई या एक्सप्रेस वेवर, कारनं प्रवास करत असताना प्रति किलोमीटर 2 रुपये 19 पैसे टोल भरावा लागणार आहे. सोहना येथील एक्स्प्रेस वेच्या एंट्री पॉईंटपासून 12 किलोमीटर अंतरावर टोलनाका उभारण्यात आला आहे. 2 रुपये 19 पैसे या टोल दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी याबाबत सविस्तर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. दोन दिवसांनी टोल दर जाहीर होतील, असं त्यांनी सांगितलं आहे. विभागीय सूत्रांवर विश्वास ठेवला तर टोल दर प्रति किलोमीटर 2 रुपये 70 पैसे होऊ शकतो. 'नवभारत टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा : फक्त 300 रुपये रेंट देऊन राहा फ्लॅटमध्ये, 'या' राज्यात सुरू झाली स्कीम
या एक्स्प्रेस वेवरील सोहना-दौसा सेक्शनवरून वाहनांची ये-जा सुरू होणार आहे. त्यामुळे गुरुग्राम ते जयपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक नवीन आणि चांगला रस्त्याचा पर्याय मिळेल. या एक्स्प्रेस वेवरून दौसा ते जयपूर हे अंतर सुमारे 70 किलोमीटर आहे. लोकांना जयपूरला जाण्यासाठी चौपदरी आग्रा-जयपूर महामार्गावरून प्रवास करावा लागणार आहे. त्याचबरोबर, एनएचएआयनं दौसा ते जयपूरला जोडणाऱ्या रस्त्याचं बांधकाम सुरू केलं आहे.
एक्स्प्रेस वेवर सोहना येथील अलीपूरपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावरील टोल प्लाझा कार्यान्वित करण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. येथे फास्टॅगवरून टोल वसूल केला जाईल. त्यासाठी नेटवर्किंग सिस्टिमचं काम सुरू आहे. जे 12 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याचा दावा केला जात आहे. टोल नाक्यांवर आवश्यक उपकरणं बसवण्यात आली आहेत. टोल कर्मचाऱ्यांसाठी कार्यालये तयार करण्याचं काम सुरू आहे.
गुरुग्रामहून जाण्यासाठी खर्च होतील 500 रुपये
डीव्हीएम एक्स्प्रेस वेवरून जयपूरला जाण्यासाठी 180 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. 2.19 रुपये प्रति किलोमीटर टोल आकारल्यास प्रवाशांना 395 रुपये मोजावे लागतील. गुरुग्रामच्या बाजूने या एक्स्प्रेसवेवर प्रवेश करण्यापूर्वी, सुमारे चार किलोमीटर आधी बांधलेला घामदोज टोल प्लाझा पार करावा लागेल. तिथे 115 रुपये टोल टॅक्स भरावा लागेल. अशा प्रकारे कारने एका बाजूनं प्रवास करण्यासाठी 515 रुपये टोल भरावा लागणार आहे.
300 रुपयांपेक्षा जास्त टोल
सध्या दिल्ली-जयपूर महामार्गावर (NH-48) गुरुग्राम आणि जयपूर दरम्यान प्रवास करताना, 225 किलोमीटर लांबीच्या रोडवर तीन ठिकाणी टोल टॅक्स वसूल केला जातो. ज्यामध्ये खेरकी दौला, शाहजहांपूर, मनोहरपूर येथे टोल प्लाझा आहेत. तिन्ही ठिकाणांचा टोल एकत्र केल्यास सुमारे 310 रुपये टोल भरावा लागतो.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक प्रकरणाला नवे वळण, औरंगाबाद पोलिसांचा धक्कादायक खुलासा
दौसापर्यंत आठ एंट्री आणि एक्झिट पॉईंट
या एक्स्प्रेस वेवर गुरुग्राम आणि दौसादरम्यान आठ एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहेत. पहिला एंट्री आणि एक्झिट पॉईंट सोहना येथील NH-248 वरून आहे. यानंतर, सोहना-पलवल रस्त्यावर सुमारे 10 किलोमीटर पुढे मुंबईच्या दिशेनं एंट्री आहे. याच्या 20 किमी पुढे वेस्टर्न पेरिफेरल केएमपी येथे एंट्री आणि एक्झिट उपलब्ध असेल. 34 किमी पुढे, नूह बल्लभगडला फक्त मुंबईकडे जाणारा रस्ता आहे. याच्या पुढे, 67 किलोमीटर अंतरावर फिरोजपूर झिरका येथे दिल्ली-मुंबईसाठी एंट्री आणि एक्झिट आहे. 145 किलोमीटरवर पिनान अलवर येथे आणि 180 किलोमीटर अंतरावर आग्रा-जयपूर महामार्गावर एंट्री आणि एक्झिट पॉईंट उपलब्ध असतील.