बजेटमध्ये Honeymoon चा प्लॅन करताय? तुमचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी 'हे' ठिकाण सर्वोत्तम

बजेटमध्ये Honeymoon चा प्लॅन करताय? तुमचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी 'हे' ठिकाण सर्वोत्तम

Best Honeymoon Destinations kerala: लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही तुम्हाला नेहमी आठवणारा सुंदर क्षण म्हणजे तुमचा हनिमूनचा काळ. हनिमून डेस्टिनेशनबद्दल मुलं-मुली खूप उत्सुक असतात, त्यामुळे हनिमूनचे बजेट कधीकधी आवाक्याबाहेर जाते. मात्र, भारतात अशी काही हनिमून डेस्टिनेशन्स आहेत, जी तुमच्या बजेटमध्ये अगदी तंतोतंत बसतील आणि तुमचा उत्साह कमी होणार नाही.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : हनीमूनसाठी भारतीय पर्यटकांच्या यादीत केरळ नेहमीच अव्वल राहिले आहे. नैसर्गिक सौंदर्याने भरलेले हे राज्य दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. केरळ हे हनिमून जोडप्यांसाठी स्वर्ग आहे. येथे फिरण्यासारखं बरेच काही आहे आणि खाजगी क्षण घालवण्यासाठी असंख्य ठिकाणे आहेत. बॅकवॉटर, वाळूने भरलेले शांत समुद्रकिनारे, हिरवळ, धुक्याने आच्छादलेल्या टेकड्या आणि यासारखे अनेक जादुई अनुभव केरळमध्ये विखुरलेले आहेत. तेही तुमच्या बजेटमध्ये.

मुन्नार Munnar

मुन्नार हे भारताच्या दक्षिण पश्चिम घाटात स्थित आहे, केरळमधील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक. केरळमधील हनिमून ठिकाणांमध्ये मुन्नार हे अनेकांचे आवडतं ठिकाण आहे. वनस्पती आणि प्राण्यांबद्दल बोलायचे झाले तर, हे शहर सुंदर चहाच्या बागांनी वेढलेले आहे, तसेच येथे अतिशय दुर्मिळ प्रजातींची फुले येतात. जोडपी या ठिकाणी दऱ्या-खोऱ्या, धबधबे आणि चहाच्या बागांमध्ये काही दिवस घालवण्यासाठी येतात.

मुन्नार ही एकेकाळी दक्षिण भारतातील ब्रिटीशांची उन्हाळी राजधानी होती आणि नंतर ती चहाच्या मळ्यांची वसाहत बनली. इथल्या सुंदर हिरव्यागार चहाच्या बागा पाहण्यासारख्या आहेत, तुम्ही चहाच्या बागांमधून फिरत, हाऊसबोटवर आनंद घेत, बॅकवॉटर एक्सप्लोर करून मुन्नारला भेट देऊ शकता. एरविकुलम नॅशनल पार्क, मट्टुपेट्टी डॅम, हायडल पार्क आणि मुन्नार टी म्युझियम ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

वायनाड Wayanad

भारताचे हरित हिल स्टेशन वायनाड कोझिकोडच्या समुद्रकिनाऱ्यापासून अगदी जवळ आहे. पश्चिम घाटात वसलेले, हे हिल स्टेशन हिरव्यागार पर्वतांनी झाकलेलं आहे. समृद्धी वनस्पती आणि प्राणी यांचे नैसर्गिक केंद्र आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाण, वायनाड हे कुर्ग, उटी, म्हैसूर, कन्नूर आणि बंगलोर सारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांशी सहज जोडलेलं आहे. निसर्ग प्रेमींसाठी, वायनाड हे खोल दऱ्या आणि घनदाट जंगलांचे नंदनवन आहे, हिरव्या खडकांनी झाकलेले, हे ठिकाण हनिमूनसाठी देखील सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. कपल्स वायनाडमध्ये हायकिंग किंवा वन्यजीव सफारीसाठी जाऊ शकतात. एडक्कल लेणी, थिरुनेल्ली मंदिर, चेंब्रा शिखर आणि बांदीपूर राष्ट्रीय उद्यान ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

अलेप्पी Alleppey

अलाप्पुझा किंवा स्थानिक लोक या शहराला अलेप्पी म्हणतात. हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या हनिमून प्रवासाच्या यादीत हे ठिकाण देखील समाविष्ट करू शकता, जे केरळमधील सर्वोत्तम हनिमून ठिकाणांपैकी एक आहे. अलेप्पीच्या समुद्रकिनाऱ्याजवळील लाइट हाऊसेस आणि सुंदर उद्याने जोडप्यांना खूप रोमँटिक बनवतात. तुम्ही इथल्या समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यास्त पाहू शकता किंवा बॅकवॉटरमध्ये 1000 हून अधिक हाउसबोट्सचे दृश्य पाहू शकता. बॅकवॉटरवर बोटिंग करताना पर्यटकांना आजूबाजूची हिरवळ आणि किनाऱ्यावरील अनेक गावांचे सौंदर्य पाहायला मिळते. अलप्पुझा बीच, अंबालपुझा श्रीकृष्ण मंदिर, कृष्णपुरम पॅलेस आणि मरारी बीच ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

कोवलम  Kovalam

केरळ हनिमून ट्रिपमध्ये कोवलमचा समावेश करणे आवश्यक आहे. तुम्ही डोळे मिटून या ठिकाणी जाण्याचा विचार करू शकता. कोवलम हे बॅकवॉटर, धुक्याच्या टेकड्या, निळ्या पाण्यासह सुंदर शांत समुद्रकिनारे यासाठी ओळखले जाते. हे ठिकाण आनंददायी हवामानामुळे हनिमून जोडप्यांना आकर्षित करते. हा समुद्रकिनारा तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करेल, तसेच येथील स्वादिष्ट खाद्यपदार्थ सर्वांना नक्कीच आवडेल. लाइट हाऊस बीच, कोवलम बीच, समुद्र बीच पार्क आणि सागरिका मरीन रिसर्च एक्वैरियम आणि हॅचरी ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

कुमारकोम Kumarakom

पहिल्यांदाच "लेक सिटी" म्हणून नाव देण्यात आलेले कुमारकोम केरळमधील हनीमूनसाठी एक आदर्श ठिकाण बनले आहे. या शहरात तुम्ही केरळमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर पाहू शकता, ज्याला वेंबनाड म्हणतात. तलाव हे प्रदेशासाठी अद्वितीय असलेल्या समृद्ध नैसर्गिक प्रजातींचे घर आहे. हनिमूनची बहुतेक जोडपी काही दिवस शांततेत कुमारकोमला येतात, सुंदर हाउसबोटींवर आराम करतात आणि बॅकवॉटरचा आनंद घेतात.

कुमारकोम हे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य देखील आहे जेथे ऋतू बदलत असताना अनेक स्थलांतरित पक्षी दिसतात. कुमारकोम पक्षी अभयारण्य, पाथीरमनल, बे आयलंड ड्रिफ्टवुड संग्रहालय आणि आदित्यपुरम सूर्य मंदिर ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

कंस पोहचालय how to reach kerala from mumbai

करेळला जायला अनेक पर्याय आहेत. तुम्ही विमानाने थेट कोची विमानतळावर उतरू शकता. त्यानंतर बस किंवा टॅक्सीने इच्छित स्थळी पोहचू शकता. दोन ते तीन महिने अगोदर बुकींग केलं तर विमानही तुम्हाला बेजटमध्ये येईल.

रेल्वेने सर्वात स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. तुम्हाला दक्षिण भारत रेल्वेने पाहण्याचा आनंदही मिळेल. मात्र, तुम्हाला तिथं पोहचायला किमान दोन दिवस लागतील. मुंबईहून अनेक खाजगी बसेसही आहेत. सध्या अनेक ऑनलाईन साईट्स आहेत. ज्यावरुन तुम्ही सहज केरळला पोहचू शकता.

स्वतःची गाडी असेल तर मज्जाच वेगळी. तुम्हाला हवा तसा प्रवासाचा आनंद घेता येईल. पाहिजे तिथं थांबवता येईल. पण, मुंबई ते केरळ अंतर खूप आहे. त्यामुळे इतक्या लांब वाहन चालवण्याची मनाची तयारी केलेली बरी.

Published by: Rahul Punde
First published: December 20, 2021, 7:07 PM IST

ताज्या बातम्या