मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Laptop and Tablet: टॅबमध्ये सिम चालतं मग लॅपटॉपमध्ये का नाही? समजून घ्या फरक

Laptop and Tablet: टॅबमध्ये सिम चालतं मग लॅपटॉपमध्ये का नाही? समजून घ्या फरक

Laptop and Tablet: टॅबमध्ये सिम चालतं मग लॅपटॉपमध्ये का नाही? समजून घ्या फरक: टॅबमध्ये सिम चालतं मग लॅपटॉपमध्ये का नाही? समजून घ्या फरक

Laptop and Tablet: टॅबमध्ये सिम चालतं मग लॅपटॉपमध्ये का नाही? समजून घ्या फरक: टॅबमध्ये सिम चालतं मग लॅपटॉपमध्ये का नाही? समजून घ्या फरक

Difference between Laptop and Tablet: टॅबलेट हे एक असं डिव्हाईस असतं, जे लॅपटॉपसारखं थोडं लहान आणि स्मार्टफोनपेक्षा थोडं मोठं असतं. टॅबलेट आपण सहजपणे वाहून नेऊ शकतो, परंतु खिशात ठेवता येत नाही अशा आकाराचा असतो. टॅबलेटमध्ये सामान्य संगणकाप्रमाणंच RAM, ROM स्टोरेज आणि स्क्रीन असते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 17 सप्टेंबर: टॅबलेट हे एक असं डिव्हाईस असतं, जे लॅपटॉपसारखं थोडं लहान आणि स्मार्टफोनपेक्षा थोडं मोठं असतं. टॅबलेट आपण सहजपणे वाहून नेऊ शकतो, परंतु खिशात ठेवता येत नाही अशा आकाराचा असतो. टॅबलेटमध्ये सामान्य संगणकाप्रमाणंच RAM, ROM स्टोरेज आणि स्क्रीन असते. थोडक्यात टॅबलेट हा आकारानं मोठा असलेला स्मार्टफोनच असतो. पण त्याचे काही फीचर्स पीसीसारखे असतात. टॅब्लेट किंवा टॅब्लेट कंप्युटर सामान्यतः मोबाइलच्या ऑपरेटिंग सिस्टमप्रमाणे कार्य करतात. यात टचस्क्रीन डिस्प्ले आणि इनबिल्ट रिचार्जेबल बॅटरी असते. यात फिजिकल कीबोर्ड नसतो आणि लॅपटॉपच्या बॅटरी लाईफच्या तुलनेत टॅबलेटमध्ये बॅटरी जास्त काळ टिकते. एकूणच, काही फंक्शन्स लॅपटॉपची असतात आणि काही स्मार्टफोनची असतात. चला तर मग जाणून घेऊया टॅबलेट लॅपटॉपपेक्षा कसा वेगळा असतो, याबद्दल..
  • लॅपटॉप हा एक पोर्टेबल संगणक असतो, जिथे सर्व काही एका पॅकेज इनबिल्ट असतात. टॅबलेट हे एक टच स्क्रीन डिस्प्ले संगणक उपकरण आहे, जे मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करते.
  • लॅपटॉप टॅब्लेटपेक्षा थोडा मोठा आणि जाड असतो. तर टॅबलेट तुलनेत लहान आणि पातळ असतो.
हेही वाचा: Jio 5G लाँच होण्यापूर्वी करा ‘हे’ महत्त्वाचं काम, नाहीतर वापरता येणार नाही हायस्पीड इंटरनेट
  • लॅपटॉपमध्ये फिजिकल किबोर्ड आणि ट्रॅक-पॅड इनबिल्ट असतं. टॅब्लेटमध्ये फिजिकल कीबोर्ड नसला तरी त्यात ऑनस्क्रीन किबोर्ड असतो आणि सर्व काम टचनं केली जातात.
  • लॅपटॉपमध्ये सिम कार्डसाठी स्लॉट नसतो. काही टॅब्लेटमध्ये सिम कार्डसाठी स्लॉट असतो.
  • लॅपटॉपमध्ये सीडी किंवा डीव्हीडी प्लेयर इनबिल्ट असू शकतात. पण टॅब्लेटमध्ये डीव्हीडी प्लेयर इनबिल्ट नसतो.
  • स्मार्टफोन आणि टॅबलेटमधील तुलनेना करत असताना आपल्याला आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे तुम्ही स्मार्टफोनमध्ये कॉल आणि एसएमएस करू शकता परंतु टॅबलेटमध्ये करू शकत नाही. टॅबलेट फोनपेक्षा जास्त जागा घेतो. तसेच तुम्ही टॅब्लेटवर आरामात ई-बुक वाचू शकता.
First published:

Tags: Tech news

पुढील बातम्या