मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartwatch खरेदी करताय? मग या गोष्टी एकदा पाहाच

Smartwatch खरेदी करताय? मग या गोष्टी एकदा पाहाच

सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टींसाठी डिजिटल साधनांचा वापर केला जातो. आपल्या देशातही आता हळहळू गॅजेट्सचा वापर वाढताना दिसत आहे.

सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टींसाठी डिजिटल साधनांचा वापर केला जातो. आपल्या देशातही आता हळहळू गॅजेट्सचा वापर वाढताना दिसत आहे.

सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टींसाठी डिजिटल साधनांचा वापर केला जातो. आपल्या देशातही आता हळहळू गॅजेट्सचा वापर वाढताना दिसत आहे.

   मुंबई, 30सप्टेंबर-  सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टींसाठी डिजिटल साधनांचा वापर केला जातो. आपल्या देशातही आता हळहळू गॅजेट्सचा वापर वाढताना दिसत आहे. अगदी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर स्मार्टवॉचचं (Smartwatch) घेता येईल. सध्या स्मार्टफोनच्या बरोबरीनं स्मार्टवॉचचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्व वयोगटांतील लोक स्मार्टवॉच वापरत असल्याचा ट्रेंड सुरू आहे. अनेकजण या स्मार्टवॉचच्या मदतीनं आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवतात. स्मार्टवॉचची चलती असल्यानं अनेक कंपन्या नवनवीन फीचर्ससह आपलं प्रॉडक्ट बाजारात सादर करत आहेत. अशा परिस्थितीत विचारपूर्वक खरेदी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्मार्टवॉच खरेदी (Smartwatch Tips) करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

  एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार,  प्रत्येक व्यक्तीकडं स्वत:चा स्मार्टफोन असतो. सध्या बाजारात अशी काही स्मार्टवॉच उपलब्ध आहेत जी स्मार्टफोनशी कनेक्ट होतात. अशा स्मार्टवॉच्या माध्यमातून तुम्ही तुमचे कॉल आणि मेसेज देखील नियंत्रित करू शकता. याशिवाय जर तुम्ही संगीतप्रेमी असाल तर त्यातून प्ले लिस्टदेखील नियंत्रित करू शकता. हे स्मार्टवॉच थोडं महागडं असतं पण, त्यातील फिचर्स नक्कीच उपयुक्त असतात.

  (हे वाचा:...तर उद्यापासून बंद होईल तुमचं Netflix, Hotstar आणि Amazon Prime)

  काही घड्याळं जशी वॉटरप्रूफ असतात तशीच काही स्मार्टवॉचही वॉटरप्रूफ सुविधेसह मिळतात. अनेकदा आपण स्मार्टवॉचसह पाण्यात हात घालतो किंवा पोहण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये सूर मारतो. अशा स्थितीत जर साधे स्मार्टवॉच असेल तर ते पाण्यामुळं खराब होण्याची भीती असते. वारंवार होणारं नुकसान टाळण्यासाठी वॉटरप्रूफ स्मार्टवॉच(Waterproof Smartwatch) खरेदी केलं पाहिजे. उन्हाळ्यात माणसाच्या अंगाला घाम जरी आला तरी त्याचा वॉटरप्रूफ स्मार्टवॉचवर परिणाम होत नाही.

  स्मार्टवॉच खरेदी करताना आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे त्यातील अॅडव्हान्स्ड फिचर्स. सध्या बाजारात उपलब्ध स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, ब्लड प्रेशर आणि डेली अॅक्टिव्हिटी मॉनिटर या सुविधा उपलब्ध आहेत. इतकचं नाही तर अगदी तुमची स्लिपिंग सायकलसुद्धा मॉनिटर करणारे काही वॉचेस आहेत. जर तुम्हाला सर्वात चांगलं स्मार्टवॉच खरेदी करण्याची इच्छा असेल तर या सर्व बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.

  (हे वाचा:तरुणांनो, आता बिअर्ड होणार सॉफ्ट आणि स्मूथ; Xiaomi नं लाँच केलं बिअर्ड ट्रिमर 2)

  आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्मार्टवॉचचा वापर केला जातो. मात्र, त्याचे काही तोटेदेखील आहेत. स्मार्टवॉचमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन(Electromagnetic radiation) उत्सर्जित होतं. त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. याशिवाय वारंवार स्मार्टवॉचकडं पाहिल्यानं कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण जातं. या गोष्टी देखील स्मार्टवॉच वापरणाऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत.त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असं स्मार्टवॉच खरेदी करताना ते उत्तम दर्जाचं खरेदी करा आणि घेतल्यावर त्याचा फायदे-तोटे नक्की समजवून घ्या.

  First published:

  Tags: Techonology