नवी दिल्ली, 22 डिसेंबर : रेडमी 9 पॉवर (Redmi 9 Power) स्मार्टफोनचा आज पहिला सेल लावण्यात आला होता. पहिल्याच सेलमध्ये फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. फोनचा सेल दुपारी 12 वाजता सुरू करण्यात आला होता आणि केवळ 30 सेकंदात संपर्ण फोनची विक्री झाली. शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आज पहिल्याच सेलमध्ये संपूर्ण स्टॉक 30 सेकंदात Out of Stock झाला. आज या फोनची खरेदी करता आली नसल्यास, 29 डिसेंबर रोजी पुन्हा पुढच्या सेलमध्ये फोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Redmi 9 Power मध्ये 6.53 इंची फुल HD+ डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन लेटेस्ट एमआययूआय 12 ऑपरेटिंग सिस्टम, अँड्रॉईड 10 वर काम करतो. तसंच फोन नोट 9 4G चं रीबॅज्ड वर्जन आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये डुअल नॅनो सिम पोर्ट मिळेल.
Redmi 9 Power स्मार्टफोनला 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सर, अल्ट्रा वाईड अँगल लेन्ससह 8 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर, 2 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर आहे.
फोनला 6000mAh बॅटरी देण्यात आली असून 18W फास्ट चार्जिंगही आहे. तसंच कनेक्टिव्हीटीसाठी 4G VoLTE, डुअल-बँड Wi-Fi, Bluetooth v5.0, GPS/ A-GPS, infrared (IR) blaster, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. शाओमीने हा स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये लाँच केला आहे. Redmi 9 Power 4 जीबी रॅम +64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम +128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Redmi, Xiaomi, Xiaomi redmi