नवी दिल्ली, 22 डिसेंबर : नातेवाईकांकडून अनेकदा लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला जातो. नातेवाईकांच्या या प्रश्नाला उत्तर देताना अनेक जण काही ना काही सांगून वेळ मारून नेतात. पण एका MI मोबाईल कंपनीच्या फॅनने लग्न करण्यासाठी वेगळंच कारण दिलं आहे. त्या तरुणाने, माझ्या हातात जोपर्यंत Mi 10T Pro स्मार्टफोन येत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असं भन्नाट उत्तर दिलं. त्याने ही इच्छा केवळ व्यक्त केली नाही, तर कंपनीने ती पूर्णही केली. कमाल अहमद या ट्विटर युजरने, Mi 10T Pro स्मार्टफोन येत नाही, तोपर्यंत लग्न करणार नसल्याचं 11 डिसेंबर रोजी ट्विट केलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच 21 डिसेंबर रोजी त्या मुलाला कंपनीकडून Mi 10T Pro स्मार्टफोन गिफ्ट करण्यात आला. हा फोन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा ट्विट करून कंपनीचे आभार मानले आहेत.
Finally received this monster. 🤩
— ᴋᴀᴍᴀʟ ᴀʜᴀᴍᴀᴅ (@kamalahamad65) December 21, 2020
The Mi 10T Pro display is indeed impressive. Most gorgeous phone. The amazing #108MP flagship #Mi10TPro.
So many features. Under 40K, #Mi10T Pro is pretty good value for a phone. 👌
🥰 Thank you so much @manukumarjain @XiaomiIndia 🙏🙏
I ❤️ Mi pic.twitter.com/RkiyE6RiDx
कंपनीने त्याच्या या ट्विट नंतर उत्तर देताना सांगितलं की, तो एमआय फॅन असल्याचं यावरून समजलं. आता त्याचा आवडीचा फोन मिळाल्यानंतर आता तो लग्न करण्यास तयार असेल असं मजेशीरपणे सांगितलं आहे.
शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनीही ट्विटरवर या तरूणाचं अभिनंदन केलं आहे.