मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Xiaomi ची नवी सीरिज लाँच; पाहा Redmi Note 11, Note 11S आणि Note 11 Pro किंमत आणि फीचर्स

Xiaomi ची नवी सीरिज लाँच; पाहा Redmi Note 11, Note 11S आणि Note 11 Pro किंमत आणि फीचर्स

Xiaomi ने आपली नवीन Redmi Note 11 फोनची सीरिज लाँच केली आहे. यामध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro, Redmi Note 11 Pro 5G आणि Redmi Note 11S यांचा समावेश आहे.

Xiaomi ने आपली नवीन Redmi Note 11 फोनची सीरिज लाँच केली आहे. यामध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro, Redmi Note 11 Pro 5G आणि Redmi Note 11S यांचा समावेश आहे.

Xiaomi ने आपली नवीन Redmi Note 11 फोनची सीरिज लाँच केली आहे. यामध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro, Redmi Note 11 Pro 5G आणि Redmi Note 11S यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली, 28 जानेवारी : चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi ने आपली नवीन Redmi Note 11 फोनची सीरिज लाँच केली आहे. यामध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro, Redmi Note 11 Pro 5G आणि Redmi Note 11S यांचा समावेश आहे. रेडमीचे फोन आणि त्यांची पूर्वीची सीरिज भारतात लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे कंपनी नवीन सीरिज लाँच करताना लोकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या ऑफर देत असते. Redmi Note 11 स्मार्टफोन्स फ्लॅट-एज्ड डिझाइन (Flat-edged design), क्वालकॉम (Qualcomm) आणि मीडियाटेक प्रोसेसरसह (MediaTek processors) येतात. रेडमीच्या नव्या सीरिजमधील हे स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लाँच झाले असून येत्या आठवड्यात ते भारतात येण्याची अपेक्षा आहे.

हे वाचा - Inbuilt Battery : फोनमध्ये इनबिल्ट बॅटरी का बसवली जाते? जाणून घ्या कारण

Redmi Note 11 सीरिज किंमत -

किमतीच्या बाबतीत, Redmi Note 11 हा या लॉटमधील सर्वांत स्वस्त फोन आहे. 4GB RAM + 64GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 13,500 पासून सुरू होते. 4GB RAM + 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत अंदाजे 15,000 रुपयांच्या आसपास आहे. तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत अंदाजे 17,200 रुपये आहे.

Redmi Note 11S भारतात 9 फेब्रुवारी 22 रोजी लाँच होणार आहे, त्याची किंमत 6GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 18,700 रुपये ठेवण्यात आली आहे. 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 20,100 रुपये आहे. तर, टॉप-स्पेक 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 22,500 रुपये आहे.

Redmi Note 11 Pro 4G ची किंमत 6GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी 22,500 रुपये, 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी 24,700 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,200 रुपये आहे. दुसरीकडे, Redmi Note 11 Pro 5G ची बेस वेरिएंट किंमत 24,700 आहे. तर मिड वेरिएंटसाठी 26,200 रुपये आणि टॉप स्पेक वेरिएंटची किंमत 28,500 रुपये आहे.

हे वाचा - नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे? आधी 'या' गोष्टींची करा खातरजमा

Redmi Note 11 सीरिज स्पेसिफिकेशन -

Redmi Note 11 -

हा फोन 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंच फुल-एचडी एलसीडी डिस्प्लेसह (full-HD LCD display) येतो. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट असून 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज (internal storage) आहे. हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सेल प्राइमरी शूटरसह क्वाड रियर कॅमेरासह येतो. यात 33W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी आहे.

Redmi Note 11S -

हा फोन 90Hz रिफ्रेश रेट आणि 6.43-इंच डिस्प्लेसह येतो. हा स्मार्टफोन MediaTek Helio G96 चिपसेट द्वारे पॉवर्ड करण्यात आलाय. यामध्ये 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. Smarpthone क्वाड रियर कॅमेरासह येतो ज्यामध्ये 108 मेगापिक्सेल प्रायमरी शूटरचा समावेश आहे. यात व्हॅनिला रेडमी नोट 11 प्रमाणेच 33W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi Note 11 Pro 5G -

हा टॉप-एंड व्हेरियंट आहे. हा 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाच्या OLED डिस्प्लेसह लाँच केला गेलाय. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह 8GB रॅम देण्यात आली आहे. स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीसह 67W फास्ट चार्जिंग होणारा आहे. Redmi Note 11 Pro 5G मध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप (triple rear camera setup) देखील आहे ज्यामध्ये 108-मेगापिक्सेल प्रायमरी शूटर, 8-मेगापिक्सेल वाइड अँगल शूटर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा (macro lens) समावेश आहे.

Redmi Note 11 Pro 4G -

हा स्मार्टफोन 5G प्रमाणेच 6.67-इंच 120Hz डिस्प्लेसह येतो. यामध्ये 8GB RAM असून त्यात MediaTek Helio G96 चिपसेट आहे. या स्मार्टफोनमध्ये 67W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि Redmi Note 11 Pro 5G प्रमाणेच कॅमेरा सेटअपसह येतो.

First published:

Tags: Redmi, Redmi users, Xiaomi redmi