मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Inbuilt Battery : फोनमध्ये इनबिल्ट बॅटरी का बसवली जाते? जाणून घ्या कारण

Inbuilt Battery : फोनमध्ये इनबिल्ट बॅटरी का बसवली जाते? जाणून घ्या कारण

सध्या स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन आणि लिथियम-पॉलिमर बॅटरीचा वापर केला जातो. या इनबिल्ट बॅटरी स्मार्टफोनला तुलनेने जास्त वेळेसाठी पॉवर देतात. हे फोनच्या डिस्प्ले (display) आणि चिपला जास्त पॉवर देतात.

सध्या स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन आणि लिथियम-पॉलिमर बॅटरीचा वापर केला जातो. या इनबिल्ट बॅटरी स्मार्टफोनला तुलनेने जास्त वेळेसाठी पॉवर देतात. हे फोनच्या डिस्प्ले (display) आणि चिपला जास्त पॉवर देतात.

सध्या स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन आणि लिथियम-पॉलिमर बॅटरीचा वापर केला जातो. या इनबिल्ट बॅटरी स्मार्टफोनला तुलनेने जास्त वेळेसाठी पॉवर देतात. हे फोनच्या डिस्प्ले (display) आणि चिपला जास्त पॉवर देतात.

  मुंबई, 27 जानेवारी : गेल्या काही वर्षात जुन्या आणि बटणांच्या फोनची जागा स्मार्टफोनने (smartphone) घेतली आहे. बटणांचे फोन बंद पडले की त्यावर चापट मारायची किंवा त्याची बॅटरी काढून फोनला नेमकं काय झालंय, याचा शोध सुरू व्हायचा. सुरुवातीला आलेल्या स्मार्टफोनमध्ये देखील बॅटरी काढता यायची. परंतु गेल्या काही वर्षांत नवनवीन तंत्रज्ञानांचा शोध लागला. फोनमधील सॉफ्टवेअर (software) आणि डिझाईनमध्ये (design) बरेच बदल झाले. त्याचाच परिणाम बॅटरीवरही (battery) झाला. म्हणजे हल्ली स्मार्टफोनच्या बॅटरी आपल्याला काढता येत नाही. त्या इनबिल्ट (inbuilt) असतात. या बॅटरी इनबिल्ट का करण्यात आल्या, याचं कारण तुम्हाला माहितीये का?, नसेल तर चला जाणून घेऊया.

  GadgetsNow च्या रिपोर्टनुसार, इनबिल्ट बॅटरी लावण्याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण सुरक्षितता (safety) आहे. आधीच्या बॅटऱ्यांमध्ये इलेक्ट्रोड होते. इलेक्ट्रोड्समुळे बॅटरीमध्ये उष्णता वाढून शॉर्ट सर्किटचा (short sericite) धोका वाढायचा. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शॉर्ट सर्किटचा धोका टाळण्यासाठी, शास्त्रज्ञांनी न काढता येण्याजोग्या म्हणजे इनबिल्ट बॅटरीची रचना केली आहे.

  Android Auto म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे फायदे आणि वापर

  फोनमधून रिमूव्हेबल बॅटरी काढून टाकण्याचे दुसरे कारण म्हणजे फोनचा लूक आणि डिझाइनमध्ये बदल करणं. म्हणजे ज्या बॅटरी काढता येतात त्या प्लास्टिक वापरून कव्हर केलेल्या असायच्या. या प्लास्टिक कव्हरमुळे (plastic cover) स्मार्टफोनचे वजन वाढते आणि स्मार्टफोन अधिक जागा व्यापतो. पण त्याच्या उलट फोनमध्ये इनबिल्ट बॅटरी बसवून ते स्लिम करण्यात आले, ज्यामुळे स्मार्टफोन्सचं वजन कमी झालं. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय.

  सध्या स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन आणि लिथियम-पॉलिमर बॅटरीचा वापर केला जातो. या इनबिल्ट बॅटरी स्मार्टफोनला तुलनेने जास्त वेळेसाठी पॉवर देतात. हे फोनच्या डिस्प्ले (display) आणि चिपला जास्त पॉवर देतात. तसेच स्मार्टफोनची इनबिल्ट बॅटरी चार्जिंगसाठी देखील खूप कमी वेळ घेते. काही फोन तर अवघ्या अर्ध्या तासांत पूर्ण चार्ज होतात.

  मुंबईत Google आणि CEO सुंदर पिचाईंविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण

  नवनवीन टेक्नॉलॉजी आणि चांगल्या अपग्रेडेड फीचर्समुळे स्मार्टफोनच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे युजर्स अशा बॅटरीच्या फोनला पसंती देतात ज्या कमी वेळेत चार्ज होतील आणि जास्त काळ टिकून राहतील. त्यामुळे फोन निर्मात्या कंपन्या देखील बॅटरीसंदर्भात चांगल्या ऑफर (offer) देण्याचा प्रयत्न करतात. एकदा फोन चार्ज केल्यानंतर तो किती वेळ टिकून राहतो, याची माहिती प्रत्येक कंपनीकडून दिली जाते.

  पूर्वी फोन गरम झाल्याने तसेच बॅटरी काढता येत असल्याने फोनचा स्फोट होण्याचा धोका जास्त असायचा. प्रामुख्याने तो धोका टाळण्यासाठी इनबिल्ट बॅटरीचा वापर स्मार्टफोनमध्ये होऊ लागला.

  First published:

  Tags: Smart phone, Tech news