Home /News /technology /

नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे? आधी 'या' गोष्टींची करा खातरजमा; त्याशिवाय गुंतवू नका पैसे

नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे? आधी 'या' गोष्टींची करा खातरजमा; त्याशिवाय गुंतवू नका पैसे

बाजारात दर महिन्याला नवीन स्मार्टफोन येत असतात, तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकालाच फोन बदलताना बजेट सोडून इतर कोणत्या गोष्टी बघायच्या हा प्रश्न पडला असेलच. फोन घेताना एकाच बजेटमधल्या वेगवेगळ्या फोनची कोणती फीचर्स बघायची हे जाणून घ्या

पुढे वाचा ...
मुंबई, 26 जानेवारी: सध्या असंही म्हणता येईल की ‘अन्न, वस्त्र, निवारा’ याबरोबरच अजून एक गोष्ट या काळात जीवनावश्यक बनली आहे, आणि ती म्हणजे मोबाईल फोन! तो पण साधासुधा नाही तर, ‘स्मार्टफोन’. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मुलांच्या शाळा, कॉलेजच्या परीक्षा आणि मोठ्यांचं ऑफिसचं काम सगळंच या फोनवर सुरु झालंय. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीपर्यंत, सगळ्यांकडेच आज स्मार्टफोन असणं आवश्यक झालं आहे. बाजारात दर महिन्याला नवीन स्मार्टफोन येत असतात, तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकालाच फोन बदलताना बजेट (Budget Smartphone) सोडून इतर कोणत्या गोष्टी बघायच्या हा प्रश्न पडला असेलच. फोन घेताना (Buying new Phone) एकाच बजेटमधल्या वेगवेगळ्या फोनची कोणती फीचर्स बघायची हे जाणून घ्या बाजारात तुमच्या बजेटमध्ये येणाऱ्या फोनपैकी तुम्हाला हवा तो फोन कसा निवडावा? फोन घेताना सगळ्यात पहिले बघितली जाते ती त्याची ऑपरेटिंग सिस्टम, OS. तुम्हाला फोन कशासाठी वापरायचा आहे यावर तुम्ही कोणत्या OS चा फोन घ्यायचा हे ठरत असतं. असं असलं तरी सगळ्यात नवीन OS असणारा फोन घेणं कधीही फायदेशीर ठरू शकतं. सध्या बाजारात असणारी सगळ्यात लेटेस्ट OS ही 12 आहे. पण हे फोन जरा महाग असू शकतात. हे वाचा-Phone Charging करतानाही खबरदारी महत्त्वाची, काय आहे कारण आणि वापरा या टिप्स यानंतर बघायची गोष्ट म्हणजे फोनचा बॅटरी बॅकअप. फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यावर किती वेळ चालतो हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. खासकरून, जर तुमचं कामच मोबाईलवर असेल तर तुम्हाला जास्त बॅटरी बॅकअपचा फोन घेणं फायदेशीर ठरेल. 3500 mah ते 4000 mahचा बॅटरी बॅकअप असलेला फोन हा सर्वांच्याच उपयोगाचा आहे. पण तुम्हाला जास्त बॅटरी बॅकअपचा फोन हवा असेल तर 6000 mahपर्यंतच्या बॅटरी बॅकअपचे फोनही बाजारात उपलब्ध आहेत. फोनचा RAM किती असावा? फोनमध्ये तुम्ही किती डेटा साठवणार आहात यावर फोनचा RAM ठरवणं आवश्यक आहे. तुमच्या फोनमध्ये जास्त फोटो, ॲप्स आणि एकूणच जास्त डेटा साठवणार असाल तर जास्त RAM असलेला फोन निवडणं योग्य राहील. पण, जास्त RAM असलेल्या फोनच्या किंमतीही जास्त असतात याची नोंद ग्राहकांनी घ्यावी. आजकाल बाजारात येणाऱ्या फोनची इंटर्नल मेमरीच 32 ते 128 GB पर्यंत असते, त्यामुळे वेगळ्या मेमरी कार्डची गरज भासत नाही. तरीही तुमचा डेटा जास्त असेल असं तुम्हाला वाटत असेल तर फोनला SD कार्डचा स्लॉट आहे ना आणि किती GBचं मेमरी कार्ड त्यात बसू शकतं हे नक्की तपासून घ्या. हे वाचा-Work From Home साठी पुरत नाही आहे मोबाइल इंटरनेट? या टिप्स फॉलो करुन वाचवा डेटा याशिवाय अजून एक गोष्ट नवीन फोन घेताना लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे तो फोन टिकाऊ आहे का! याआधी हा फोन कोणी घेतला आहे का? त्याबद्दल त्यांचे काय रिव्हिव्यू आहेत हे जाणून घेऊन आणि मगच तुम्ही तो घ्यायचा की नाही याचा निर्णय घ्या.
First published:

Tags: Mobile Phone, Money

पुढील बातम्या