मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फक्त 15 मिनिटांत पूर्ण चार्ज! नव्या वर्षात लाँच होणार Xiaomi 11i

फक्त 15 मिनिटांत पूर्ण चार्ज! नव्या वर्षात लाँच होणार Xiaomi 11i

Xiaomi 11i

Xiaomi 11i

चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi नवीन वर्षात भारतात नवा मोबाईल लॉन्च करणार आहे. मिड-रेंज स्मार्टफोन Xiaomi 11i हायपरचार्ज पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होणार आहे.

नवी दिल्ली, 28 डिसेंबर:  तुम्ही नवीन स्मार्टफोन (Smart Phone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडे दिवस थांबा. कारण नव्या वर्षात अनेक दमदार स्मार्टफोन लाँच होणार आहेत. शाओमी ही स्मार्टफोन उत्पादन करणारी प्रसिद्ध चिनी कंपनी (Xiaomi) नव्या वर्षात भारतामध्ये नवे मोबाइल लाँच करणार आहे. त्यापैकीच मध्यम किमतीचा Xiaomi 11i HyperCharge हा स्मार्टफोन जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात लाँच होईल.

शाओमीचा दावा आहे, की Xiaomi 11i HyperCharge या फोनला दमदार बॅटरी बॅकअप आहे. या फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंगचं फीचर मिळणार आहे. या फोनमध्ये दमदार बॅटरीसोबतच भन्नाट डिस्प्लेही असणार आहे. या फोनमध्ये 120Hz एवढा डिस्प्ले असेल. हा अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करील.

केवळ 15 मिनिटांत होणार पूर्ण चार्ज

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शाओमी 11i हायपरचार्ज (Xiaomi 11i HyperCharge) स्मार्टफोन आधीही लाँच करण्यात आला होता; पण Redmi Note 11 Pro+ हे त्याचं रिब्रँडेड व्हर्जन असेल. शाओमी 11i हायपरचार्ज फोनमध्ये काही फ्लॅगशिप-ग्रेड फीचर्सही मिळतील. या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 120W फास्ट-चार्जिंग सपोर्ट असेल. त्यामुळे फक्त 15 मिनिटांमध्ये बॅटरी पूर्ण चार्ज होईल. असं म्हटलं जातंय, की हा फोन भारतातला सर्वांत जलद चार्ज होणारा फोन असेल. कारण आतापर्यंत फक्त 100W चार्जिंग स्पीड सपोर्ट असणारे स्मार्टफोन बाजारात आहेत.

दमदार डिस्प्ले

Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोनमध्ये 120Hz चा डिस्प्ले असेल. या डिव्हाइसमध्ये 6.67 इंच पूर्ण-एचडी+ (1080×2400 पिक्सेल) सुपर इमोलेड स्क्रीन देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ असेल आणि त्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चं संरक्षण आहे. या फोनमध्ये पंच-होल फ्रंट स्क्रीन, स्लीम बेजेल्स आणि एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 920 प्रोसेसरसोबत 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज क्षमता आहे.

Xiaomi 11i HyperCharge फोनच्या मागच्या बाजूला आयताकृती (Rectangular) कॅमेरा युनिट असेल. मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेट आहे. त्यामध्ये 108MP चा प्रायमरी सेन्सर, 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP च्या टेलिमायक्रो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी पुढे 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

किती असेल किंमत (Xiaomi 11i HyperCharge Price in India)

आत्तापर्यंत कंपनीने शाओमी 11i हायपरचार्ज स्मार्टफोनची किंमत जाहीर केलेली नसली तरी तज्ज्ञांनुसार, या स्मार्टफोनची किंमत 25 हजार रुपये एवढी असू शकते.

आता हा स्मार्टफोन बाजारात आल्यावर ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडणार यात शंका नाही. मग तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर पुढच्या वर्षीचा मुहूर्त काढा.

First published:

Tags: Smart phone, Smartphones, Xiaomi