मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचा Smartphone होतोय Hang? हे सोपे उपाय ठरतील फायदेशीर

तुमचा Smartphone होतोय Hang? हे सोपे उपाय ठरतील फायदेशीर

आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Smartphone Tips And Tricks) सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा मोबाईल हँग होणार नाही.

आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Smartphone Tips And Tricks) सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा मोबाईल हँग होणार नाही.

आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Smartphone Tips And Tricks) सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा मोबाईल हँग होणार नाही.

  मुंबई, 27 डिसेंबर : स्मार्टफोनने (Smartphone) आपलं आयुष्य अगदी सोपं केलं आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलशिवाय राहणे शक्य नाही. सर्व गोष्टी मोबईलवर उपलब्ध आहेत.  कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण आल्यानंतर त्याबद्दल आपण लगेच गुगल करतो. अनेक फोटोज, फाईल्स यासारख्या भरपूर गोष्टी डाऊनलोड करतो. यामुळे मोबाईलवर लोड पडतो आणि तो हँग (Phone Hang) व्हायला लागतो. मग आशावेळी मोबाईल बदलावा असं वाटतं. जर तुम्ही याच अडचणीचा सामना करत आहात, तर आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Smartphone Tips And Tricks) सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा मोबाईल हँग होणार नाही. या टिप्स वापरल्यानंतर तुमचा फोन अगदी सुरळीत चालायला लागेल.

  मोबाईल हँग होण्याची अनेक कारणे आहेत. आपण फोनद्वारे अनेक कामे करतो. यातील सर्च इंजिनचा आपण सर्वांत जास्त वापर करतो. आपल्या अनेक लहान मोठ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आपण गुगल क्रोम आणि मोझीला फायरफॉक्स सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतो. यावर जे काही सर्च करतो, ते आपोआप कुकीज आणि कॅशे सारखे स्टोअर्समध्ये जतन होते. यामुळे फोनच्या मेमरीला लोड होतो आणि हँग व्हायला लागतो. त्यामुळे गरज नसलेल्या गोष्टी मोबाईलमधून डिलीट करणे गरजेचे असते, असं वृत्त झी न्यूजने दिलं आहे.

  अनेक जणांच्या मोबाईल मध्येमोझीला फायरफॉक्स (Mozilla Firefox) असते. मोझीला फायरफॉक्समधून कॅशे आणि कुकीज कसे क्लिअर करायचे हेही आपण जाणून घेऊया. सर्वांत पहिल्यांदा आपल्या Android स्मार्टफोनवर मोझीला फायरफॉक्स ओपन करा. यानंतर अॅड्रेस बारच्या उजव्या बाजूला असलेल्या ‘मोअर’ पर्यायावर क्लिक करा. सेटिंगमध्ये जा आणि डिलिट ब्राउझिंग डेटामधील कुकीज अॅण्ड साइट डेटा आणि कॅश्ड इमेज आणि फाइल्सला क्लिक करत संपूर्ण डेटा क्लिअर करा.

  याशिवाय, अनेक जण गुगल क्रोमचा (Google Chrome) वापर करतात. जर तुम्हीही गुगल क्रोमचा वापर करत असाल तर पहिल्यांदा तेथून कॅशे आणि कुकीज डिलिट करा. यासाठी प्रथम गुगल क्रोम उघडा, यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा आणि नंतर हिस्ट्री या पर्यायावर जा. हिस्ट्री ओपन केल्यानंतर तुम्हाला क्लिअर ब्राउझिंग डेटा हा पर्याय दिसेल. त्याला निवडा, यानंतर ‘कुकीज अॅण्ड साइट डेटा’ आणि ‘कॅश्ड इमेज अॅण्ड फाइल्स’ ला सिलेक्ट करा. त्यानंतर क्लिअर डेटावर किल्क करा. तसंच कधीपर्यंतचे कॅशे आणि कुकीज डिलिट करायचे आहे, हेही तुम्ही निवडू शकता. यामुळे तुमच्या मोबईलमधील कॅशे क्लिअर होईल. असे करून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या स्मार्टफोनचा वेग वाढवू शकता.

  First published:

  Tags: Smartphone, Tech news