मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /5G ची प्रतीक्षा संपली! कधी आणि कोणत्या शहरांमध्ये सर्वात आधी होणार लॉन्चिंग

5G ची प्रतीक्षा संपली! कधी आणि कोणत्या शहरांमध्ये सर्वात आधी होणार लॉन्चिंग

भारतात 5G चाचणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे आणि मे 2022 पर्यंत देशात 5G चाचणी चालेल. संपूर्ण देश 5G च्या व्यावसायिक लॉन्चची वाट पाहत आहे, परंतु अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट दिले गेले नाही.

भारतात 5G चाचणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे आणि मे 2022 पर्यंत देशात 5G चाचणी चालेल. संपूर्ण देश 5G च्या व्यावसायिक लॉन्चची वाट पाहत आहे, परंतु अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट दिले गेले नाही.

भारतात 5G चाचणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे आणि मे 2022 पर्यंत देशात 5G चाचणी चालेल. संपूर्ण देश 5G च्या व्यावसायिक लॉन्चची वाट पाहत आहे, परंतु अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट दिले गेले नाही.

मुंबई, 27 डिसेंबर : भारतात 4G नेटवर्कमुळे (4G Network) विविध क्षेत्रात झालेले अमुलाग्र बदल सर्वांनीच पाहिले आहेत. अनेक कामं 4G मुळे मोबाईलवर (Mobile Network) होऊ लागली आहेत. मात्र 4G नंतर आता लोक 5G ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 5G च्या  (5G Network) एन्ट्रीने खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती होण्याची शक्यता आहे. मात्र ज्याची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते ती बातमी आज आली आहे. दूरसंचार विभागाने (DoT) सोमवारी आपल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, गुरुग्राम, बंगळुरू, कोलकाता, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे यासह महानगरे आणि मोठी शहरे पुढील वर्षी 5G सेवा मिळवणारे पहिले मानकरी असतील. मार्च-एप्रिल 2022 मध्ये 5G साठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याची सरकारची योजना आहे.

यावर्षी सप्टेंबरमध्ये, दूरसंचार क्षेत्रातील नियामक TRAI कडून स्पेक्ट्रमच्या लिलावावर दूरसंचार विभागाने (Telecom Department) शिफारसी मागवल्या होत्या, ज्यात प्रामुख्याने रिझर्व्ह प्राईज, बँड प्लान, ब्लॉक साईज, क्वॉन्टम ऑफ स्पेक्ट्रमचे इत्यादींचा समावेश होता. ट्रायने या विषयावर उद्योगातील भागधारकांशी सल्लामसलत सुरू केली आहे.

Best 5G Smartphones : 20 हजारांहून कमी किंमतीत घेता येतील हे फोन, पाहा काय आहेत फीचर्स

कंपन्या कुठे चाचणी करत आहेत?

भारतात 5G चाचणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे आणि मे 2022 पर्यंत देशात 5G चाचणी चालेल. संपूर्ण देश 5G च्या व्यावसायिक लॉन्चची वाट पाहत आहे, परंतु अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही. आता ज्या शहरांमध्ये 5G सेवा प्रथम मिळवण्याची घोषणा करण्यात आली आहे, तेथे Jio, Airtel आणि Vodafone-idea त्यांच्या 5G नेटवर्कची चाचणी घेत आहेत. दूरसंचार ऑपरेटर Bharti Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea यांनी गुरुग्राम, बंगळुरू, कोलकाता, मुंबई, चंदीगड, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनौ, पुणे, गांधीनगर या शहरांमध्ये 5G चाचणी साइट्स स्थापन केल्या आहेत.

एक देश एक आपत्कालीन नंबर, मोबाइल नेटवर्कशिवायही या नंबरवर कॉल करून मिळेल मदत

5G चा वेग सर्वोत्तम असेल

देशात 5G लागू झाल्यानंतर मोबाईल टेलिफोनचे जग बदलून जाईल. एका अंदाजानुसार, 5G चा स्पीड 4G पेक्षा 10 पट जास्त आहे. 5G सेवेचा शुभारंभ डिजिटल क्रांतीला नवा आयाम देईल. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल. ई-गव्हर्नन्सचा विस्तार होईल. कोरोनाच्या काळात इंटरनेटवर ज्याप्रकारे प्रत्येकाचे अवलंबित्व वाढले आहे. ते पाहता, 5G आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे जीवन अधिक चांगले आणि सोपे बनवण्यात मदत होईल. गांधी नगर या शहरांमध्ये 5G चाचणी साइट्स स्थापन केल्या आहेत.

First published:

Tags: Airtel, Digital services, Reliance Jio