Work From Home : इंटरनेट Disconnect होत असेल तर ऑफलाइन मोड सेटअपचा असा करा वापर

Work From Home : इंटरनेट Disconnect होत असेल तर ऑफलाइन मोड सेटअपचा असा करा वापर

आर्टिकल किंवा माहिती शेअर करण्यासाठी गुगलच्या खास फीचरचा वापर करता येईल. यामुळे ऑफलाइन मोडवर काम केल्यानं इंटरनेट कनेक्शन जात असेल तरीही डेटा किंवा माहिती सेव्ह राहते.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम कऱण्याचे आदेश दिले आहेत. ऑफिसमध्ये असलेला सेटअपच्या तुलनेत घरी कमी साधनं उपलब्ध असतात. त्यामुळे घरी काम करताना येणाऱ्या अडचणींचा कामावर परिणाम होतो. यात तुम्हाला आर्टिकल किंवा माहिती शेअर करण्यासाठी गुगलच्या खास फीचरचा वापर करता येईल. यामुळे ऑफलाइन मोडवर काम केल्यानं इंटरनेट कनेक्शन जात असेल तरीही डेटा किंवा माहिती सेव्ह राहते.

Google Docs हे एक ऑनलाइन वर्ड प्रोसेसर असून युजर्सना अनेक लोकांसोबत एकाचवेळी डॉक्युमेंट शेअर करता येते. याशिवाय यामध्ये अनेक लोक एकाचवेळी काम करू शकतात. तसेच त्यामध्ये रिअल टाइम होत असलेले बदलही पाहता येता. मात्र तुम्ही घरी काम करत असाल तेव्हा इंटरनेट कनेक्शन वारंवार जाण्याची शक्यता असते. त्यावेळी डेटा डिलीट होण्याची भीती असते. पण गुगल डॉक्समध्ये असं एक फीचर आहे ज्यामुळे तुम्ही ऑफलाइन काम करू शकता. त्यामुळे इंटरनेट गेलं तरीही डेटा सुरक्षित राहतो. यासाठी Google Docs Offline मोडचा पर्याय आहे.

ऑफलाइन मोड सुरु केल्यानंतर इंटरनेट कनेक्शन मधेच गेलं आणि पुन्हा आलं की स्वत:हून डेटा अपडेट करतं. याशिवाय इंटरनेट कनेक्शन नसेल तेव्हाही याचा उपयोग होतो. या फीचरचा वापर फक्त गुगल क्रोमवरच करता येतो. त्यामुळे तुमच्याकडं गुगल क्रोम असणं गरजेचं आहे.

गुगल डॉक्स वापरण्यासाठी Google Chrome ओपन करा. त्यानंतर Google Chrome offline extension इन्स्टॉल करा. त्यामध्ये Google Docs, Sheets (शीट्स), Slides (स्लाइड्स) या पर्यायावर जा. त्यानंतर सेटिंग पर्यायात Offline टॉगल सुरु करताच एक्स्टेंशन आपोआप लेटेस्ट docs, Sheet आणि Slides डेटाला ऑफलाइन वापरासाठी अपडेट करेल.

हे वाचा : Jio चा डबल धमाका, 11 ते 101 रुपयांच्या प्लॅनवर टॉकटाइमसह मिळणार दुप्पट डेटा

डेटा अपडेट झाल्यानंतर स्क्रीनवर एक नोटिफिकेशन दिसेल. त्यात ऑफलाइन मोड अॅक्टिवेट आणि सेटअप झाल्याचं सांगितलेलं असतं. युजर्सना Files पर्यायातून Make available offline वर क्लिक करून मॅन्युअली आवश्यक त्या फाइल्स ऑफलाइन मोडवर सेव्ह करता येतं. त्यामुळे इंटरनेट कनेक्शन सुरुच असण्याची किंवा ते डिसकनेक्ट झाल्यास काम सुरुच राहतं.

हे वाचा : इंटरनेट स्लो झालंय का? सोप्या टिप्स वापरून काही सेकंदात होईल काम

First published: March 20, 2020, 7:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या