Home /News /news /

इंटरनेट स्लो झालंय का? सोप्या टिप्स वापरून काही सेकंदात होईल काम

इंटरनेट स्लो झालंय का? सोप्या टिप्स वापरून काही सेकंदात होईल काम

वाय फाय कनेक्शनच्या स्पीडची समस्या असेल तर त्यासाठी काही सोप्या टीप्स आहेत. त्यामुळे इंटरनेटचं स्पीड वाढू शकेल.

    नवी दिल्ली, 19 मार्च : कोरोना व्हायरसमुळे अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरातून काम करत आहेत. अशा परिस्थितीत काम करताना काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यात महत्वाचं म्हणजे इंटरनेट कनेक्शन. रेंज जाणं किंवा कमी स्पीड यामुळे कामात अडथळा येऊ शकतो. जर तुम्हालाही वाय फाय कनेक्शनच्या स्पीडची समस्या असेल तर त्यासाठी काही सोप्या टीप्स आहेत. त्यामुळे इंटरनेटचं स्पीड वाढू शकेल. वाय फाय कनेक्शनच्या स्पीडमध्ये राउटर महत्वाचा ठरतो. जर तो योग्य ठिकाणी नसेल तर सिग्नल येणार नाही. त्यामुळं स्पीड कमी होतं. वाय फाय कनेक्शनमध्ये सिग्नल इलेक्टोमॅग्नेटिक रेडिएशनमधून पाठवला जातो. तो इतर अडथळ्यामुळे कमी होऊ शकतो. राउटर शक्यतो इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर ठेवा. तसंच घराच्या मधोमध ठेवा ज्यामुळं कुठेही बसून काम करता येईल. राउटरला अँटिना असेल तर तो सिग्नल पकडेल असा सेट करून घ्या. तुमच्या राउटरला अँटिना नसेल तर त्याला एक्स्टर्नल अँटिना जोडता येतो. त्याशिवाय ऑम्नीडायरेक्शनल अँटिना सिग्नलसाठी उपयुक्त ठरतो. त्याचा वापर करून इंटरनेटचं स्पीड वाढवता येतं. प्रत्येक वाय फाय डिव्हाइसची रेंज मर्यादित आणि ठरलेली असते. त्या रेंजच्या बाहेर सिग्नल कमी जास्त होतो आणि तुमचं नेट स्पीड कमी होतं. यासाठी रेंज एक्सटेंडरचा वापर करता येईल. राउटरचा सिग्नल यामुळे जास्त अंतरापर्यंत पाठवला जातो. रेंज एक्सटेंडरचा आयपी अॅड्रेस वेगळा असतो आणि सिग्नल स्ट्राँग पकडण्यासाठी त्याला राउटरजवळ ठेवायला लागतं. तुम्ही काम सुरू करण्याआधी वाय फाय राउटर रिबूट करून घ्या. रिबूट केल्यानं त्यावर असलेल्या जुनी मेमरी क्लिअर होते आणि अपडेट होते. त्यामुळं इंटरनेट अॅक्सेस करताना अडचणी येत नाहीत. हे वाचा : कोरोनापासून वाचण्यासाठी Work From Home करताय? मग लक्षात ठेवा या गोष्टी स्ट्राँग वायफाय कनेक्शन वापरणं कधीही फायद्याचं ठरतं. त्यासाठी तुमचा पासवर्ड कोणालाही शेअर करू नका. एकाच वेळी जास्त लोक कनेक्शन वापरत असतील तर नेट स्पीड कमी होते. तुमचा पासवर्डसुद्धा ठराविक काळाने बदलत रहा. हे वाचा : सावधान! एसीमुळे कोरोनाचा धोका, उकाड्यात थंडावा घेताना विचार करा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या