Jio चा डबल धमाका, 11 ते 101 रुपयांच्या प्लॅनवर टॉकटाइमसह मिळणार दुप्पट डेटा

Jio चा डबल धमाका, 11 ते 101 रुपयांच्या प्लॅनवर टॉकटाइमसह मिळणार दुप्पट डेटा

डेली इंटरनेट डेटा पॅक संपल्यानंतर डेटासाठी अशी खास व्हाउचर्स जिओने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली होती. त्या व्हाउचर्सवर मिळणाऱ्या डेटामध्ये दुप्पट वाढ केली आहे.

  • Share this:

मुंबई. 20 मार्च : रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी स्वस्तातले इंटरनेट डेटा प्लॅन दिले आहेत. टेरिफ चार्जेस वाढल्यानंतरही कंपनीने स्वस्तात सेवा पुरवली आहे. यात आता 4जी डेटा व्हाउचर्समध्ये आणखी ऑफर दिल्या आहेत. यामध्ये जुन्या ऑफरवर मिळणारे फायदे वाढवण्यात आले आहेत. ज्या डेटा व्हाउचर्सना रिवाइज केलं आहे त्यामध्ये 11, 21, 51 आणि 101 रुपयांच्या व्हाउचर्सचा समावेश आहे.

डेली इंटरनेट डेटा पॅक संपल्यानंतर डेटासाठी अशी खास व्हाउचर्स जिओने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली होती. त्या व्हाउचर्सवर मिळणाऱ्या डेटामध्ये दुप्पट वाढ केली आहे. याआधी 11 रुपयांच्या प्लॅनमध्ये 400 एमबी डेटा मिळत होता. आता त्याच रिचार्जवर 800 एमबी डेटा आणि इतर नेटवर्कसाठी 75 मिनिटे टॉकटाइम मिळेल.

याशिवाय 21 रुपयांच्या प्लॅनवर आता 1 जीबी ऐवजी 2 जीबी डेटा आणि 200 मिनिटे टॉकटाइम मिळेल. 51 रुपयांच्या प्लॅनवरही मिळणारा फायदा डबल झाला आहे. 51 रुपयांच्या रिचार्जवर 3 जीबी डेटा मिळत होता. आता त्याऐवजी 6 जीबी डेटा आणि 500 मिनिटे कॉलिंगसाठी मिळणार आहेत. तर 101 रुपयांच्या प्लॅनवर 6 जीबी ऐवजी 12 जीबी डेटा मिळेल. यासोबतच 1000 मिनिटे टॉकॉटाइम मिळणार आहे. या सर्व प्लॅनवर डेटा संपल्यानंतर 64 केबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटाही वापरता येणार आहे. याची वैधता मात्र सध्याच्या प्लॅनएवढीच असणार आहे.

हे वाचा : इंटरनेट स्लो झालंय का? सोप्या टिप्स वापरून काही सेकंदात होईल काम

जिओने त्यांच्या 251 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी इंटरनेट डेटा दिला जात आहे. याची वैधता 51 दिवस अतून यासोबत ग्राहकांना कॉलिंगसाठी आयुसी टॉप अप रिचार्ज करावं लागेल.

हे वाचा : WhatsApp वर Deleted मेसेजही वाचता येतात, वापरा 'ही' ट्रिक

First published: March 20, 2020, 5:21 PM IST

ताज्या बातम्या