नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : टेक्नोलॉजीमुळे जगभरात अनेक बदल घडले आहेत. जगण्याच्या पद्धतीत, व्यवहारात अनेक गोष्टींमध्ये कमालीचे बदल झाले. रोख व्यवहारादरम्यान डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे, पेटीएम असे कितीतरी ऑनलाइन व्यवहारासाठीचे प्रकार उपलब्ध झाले. आता याहून पुढे जात भन्नाट पेमेंट सिस्टम येण्याच्या तयारीत आहे. यासाठी ना पैसे मागितले जातील, ना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड. आता तुमच्या चेहऱ्याच्या स्कॅनिंगनेच पेमेंट होईल.
या नव्या पेमेंट सिस्टमला फेशियल रिकोग्निशन म्हटलं जातं. हे बायोमेट्रिक वेरिफिकेशनवर आधारित आहे. यात ग्राहक आणि स्टोर सिस्टमदरम्यान कोणताही संपर्क होणार नाही. यात कॅश किंवा कार्डने पेमेंट करण्याची गरज नाही. यात पेमेंट करण्यासाठी एका खास प्रकारच्या कॅमेरासमोर उभं राहण्याची गरज आहे. या कॅमेरासमोर उभं राहून शॉपिंगचं पेमेंट होईल.
बायोमेट्रिक वेरिफिकेशनमध्ये ज्याप्रमाणे तुमच्या बोटांचे ठसे किंवा स्कॅनिंग केलं जात, फेशियल रिकोग्निशनमध्येही असाच प्रकार असतो. इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार, 2025 पर्यंत संपूर्ण जगभरात 1.4 अब्जाहून अधिक लोक फेशियल रिकोग्निशनद्वार पेमेंट करतील. हे सिस्टम अतिशय सुरक्षित असल्याचं बोललं जात असून याची मागणीही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नवं सिस्टम कसं करेल काम?
संपर्कात न येता, चेहऱ्याच्या आधारे पेमेंट करण्यासाठी विजनलॅब्स नावाच्या नेदरलँड्समधील एका कंपनीने नुकतंच आपल्या बायोमेट्रिक पेमेंट हार्डवेअर - विजनलॅब्स लूना पीओएस टर्मिनल लाँचची घोषणा केली. हे पेमेंट सिस्टम स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी फेशियल रिकोग्निशनद्वारे ग्राहकच्या चेहऱ्याला स्कॅन करतं.
आधार कार्डमध्ये ज्याप्रमाणे फिंगर प्रिंट घेतलं जातं, त्याचप्रमाणे फेशियल रिकोग्निशनमध्ये चेहऱ्याचा आकार, नाकाचा आकार, डोळे, हनुवटी अशा अनेक डिटेल्स फेशियल रिकोग्निशनमध्ये घेतल्या जातात आणि अशा सर्वांच्या मदतीने एक फेसप्रिंट तयार होतो.
हा फेसप्रिंट बँक अकाउंटशी जोडला जातो. बँकेत ग्राहकाचा हा डेटा पेमेंट सिस्टम वेरिफाय करतो. यासाठी ग्राहकाला स्कॅनरसमोर उभं राहावं लागतं. या पेमेंट सिस्टममध्ये त्याच खात्यातून पैसे कट होतात, ज्याचं फेशियल रिकोग्निशन जोडलेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.