मुंबई , 24 फेब्रुवारी: व्हॉट्सअॅप (WhatsApp) हा लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे लाखो युजर्स आहेत. मेसेजिंग, शेअरिंग व्यतिरिक्त कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग, आर्थिक देवाणघेवाणीसारख्या अनेक गोष्टींसाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. नातेवाईक, मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांसोबत कनेक्टेड (Connect) राहण्यासाठी व्हॉट्सअॅप वापरलं जातं. व्हॉट्सअॅप युजर्सला चॅटिंग, शेअरिंगचा आनंद मिळावा यासाठी सातत्याने नवनवी फीचर्स (Features) आणत असतं. काही महिन्यांपूर्वी प्रायव्हसीच्या (Privacy) मुद्द्यावरुन व्हॉट्सअॅप चर्चेतदेखील आलं होतं. अर्थात त्याचा काहीसा परिणाम व्हॉट्सअॅपवर झाल्याचं दिसून आलं होतं. व्हॉट्सअॅपमध्ये अशी काही फीचर्स आहेत, की ज्याविषयी बहुतांश युजर्सना फारशी माहिती नसते. व्हॉट्सअॅपवरून तुम्ही सर्वाधिक प्रमाणात कोणत्या व्यक्तीसोबत चॅटिंग (Chatting) केलं आहे, हे आता जाणून घेता येतं. हे व्हॉट्सअॅपमधलं अनोखं फीचर म्हणता येईल. तुमच्या पार्टनरने सर्वाधिक चॅटिंग कोणासोबत केलंय हे तुम्हाला या फीचरच्या माध्यमातून जाणून घेता येतं. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या अनोख्या फीचर्सपैकी हे एक फीचर ठरतं. या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. याविषयीची माहिती `झी न्यूज हिंदी`ने दिली आहे. या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित Cars, क्रॅश टेस्टमध्ये मिळालं 5 स्टार रेटिंग आजकाल मोबाईल सुरु केल्यावर बहुतांश युजर्स आपल्याला काही मेसेजेस आले आहेत का, हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअॅप चेक करतात. यावरून व्हॉट्सअॅपची गरज आणि लोकप्रियता स्पष्ट होते. व्हॉट्सअॅपवर एकावेळी अनेक जणांशी कनेक्ट राहण्यासाठी ग्रुप्स (Groups) बनवतो. तसंच काही व्यक्तींशी वैयक्तिक चॅटिंगही (Personal Chatting) करतो. आपण कोणत्या व्यक्तींसोबत सर्वाधिक चॅटिंग केलं आहे, हे कसं जाणून घ्यायचं याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. पण आता आपण कोणत्या व्यक्तीशी सर्वाधिक चॅटिंग केलं आहे, हे एका ट्रिकच्या माध्यमातून जाणून घेता येते. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअॅप सुरु करावं आणि त्यानंतर वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉटसवर क्लिक करावं. त्यानंतर सेटिंग्जमध्ये जावं. येथे तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. त्यापैकी `स्टोरेज अँड डाटा` (Storage And Data) नावाच्या ऑप्शनवर क्लिक करावं. हा ऑप्शन उघडल्यानंतर पुन्हा तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. त्यापैकी `मॅनेज स्टोरेज`वर (Manage Storage) क्लिक करावं. येथे क्लिक करताच तुम्ही ज्या व्यक्तींसोबत सर्वाधिक चॅटिंग केलं आहे, त्याची लिस्ट दिसेल. तुमचा Smartphone असा चार्ज करत असाल तर सावधान…एका चुकीने महिलेने गमावला जीव जर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या मोबाईलचा पासवर्ड माहिती असेल तर, पार्टनर व्हॉट्सअॅपवर सर्वाधिक चॅटिंग कोणत्या व्यक्तींसोबत केलं आहे, ते तुम्ही या फिचरच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. या फिचरमुळे कोणती व्यक्ती चॅटिंगच्या माध्यमातून तुमच्या सर्वाधिक संपर्कात आहे, हेदेखील समजू शकतं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.